मिड रेंज अँड्रॉइड फोनच्या किमतीत आयफोनची खरेदी करा… 12000 च्या फ्लॅट डिस्काउंटसह मिळवा ऑफर्स
फ्लिपकार्टच्या सुरु असलेल्या ‘फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेल’मध्ये आयफोनच्या सर्व मॉडेल्सवर फ्लॅट डिस्काउंट तसेच एक्सचेंज आणि अनेक बँक ऑफर्स देण्यात येत आहे.

फ्लिपकार्टचा (Flipkart) हा सेल 17 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये, कंपनी विविध व्हेरिएंटमधील प्रोडक्टवर मोठ्या ऑफर्स देत आहे, ज्यामध्ये फॅशन, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल फोनचा समावेश आहे. सेल दरम्यान ग्राहकांना अतिशय कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. खासकरून आयफोनवर (Apple iPhone) मोठे डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये आयफोन 11, आयफोन 12, आयफोन 13 सीरीज तसेच सर्वात स्वस्त आयफोन एसई 3 (iPhone SE 3) यांचा समावेश आहे. डिस्काउंटसोबतच कंपनी फोनवर बोनस आणि बँक ऑफरही देत आहे.
1) iPhone SE 2020
या फोनची सध्याची किंमत 39,900 रुपये असून विक्री किंमत 29,900 आहे. iPhone SE Apple चा सर्वात स्वस्त iPhone आहे. iPhone SE 2020 ची सुरुवातीची किंमत 64GB व्हेरिएंटसाठी 29,999 रुपये, 128GB व्हेरिएंटसाठी 34,900 रुपये आणि 256GB मॉडेलसाठी 44,900 रुपये आहे. फोनमध्ये मोफत BYJU’s 3 लाइव्ह क्लासेसचा समावेश आहे ज्याची किंमत 999 रुपये आहे, Gaana Plus चे 3 महिने सबस्क्रिप्शन आणि Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन. Axis Bank कार्ड्सवर बँक ऑफर असून 12,500 चे अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत.
2) iPhone 11
या स्मार्टफोनची सध्याची किंमत 49,900 रुपये आहे. तर, विक्री किंमत 41,999 रुपये आहे. iPhone 11 च्या 64GB स्टोरेजची किंमत 49,900 रुपये आहे, तर 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,900 रुपये आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,250 सूट देण्यात येईल, त्यानंतर हा फोन 41,999 आणि 46,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतो. यासोबतच फोनच्या एक्सचेंजवर 12,500 रुपयांची सूटही दिली जात आहे. फ्लिपकार्ट फोनवर BYJU’s चे तीन लाइव्ह क्लासेस, Gaana Plus आणि Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळत आहे.
3) iPhone 12
आयफोन 12ची सध्याची किंमत 65,900 रुपये असून त्याची विक्री किंमत 53,999 रुपये आहे. iPhone 12 च्या 64GB मॉडेलची किंमत 65,900 रुपये, 128GB व्हेरिएंटची किंमत 70,900 रुपये आणि 256GB मॉडेलची किंमत 80,900 रुपये आहे. सेलमध्ये हा फोन 18 टक्क्यांच्या सवलतीने विकला जात आहे, त्यानंतर तो 53,999 रुपये, 58,999 रुपये आणि 68,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. अॅक्सिस बँक क्रेडिटसह व्यवहार केल्यास 2,250 रुपयांची अतिरिक्त सूट देखील आहे.
4) iPhone 13
सध्याची किंमत 79,900 रुपये असून विक्री किंमत 89,900 आहे. iPhone 13 वर देखील चांगली सूट मिळत आहे. मुळ किंमतीवर 9901 रुपयांची मोठी सूट आहे. त्यानंतर त्याच्या 128GB व्हर्जनची किंमत 69,999 रुपये आहे, तर 256GB व्हर्जनची किंमत 79,999 रुपये आहे. Axis Bank कार्डवर 10 टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट 15,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. BYJU चे 3 लाइव्ह क्लासेस मोफत आहेत.
5) iPhone 13 Mini
या स्मार्टफोनची सध्याची किंमत 69,900 रुपये व विक्री किंमत 64,999 रुपये आहे. सवलतीनंतर iPhone 13 Mini आता 128GB व्हेरिएंटसाठी 64,999 रुपये आणि 256GB मॉडेलसाठी 73,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनवर 15,500 रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे. Axis Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर अतिरिक्त 10 टक़्के सूट आहे.
6) iPhone SE 3
सध्याची किंमत 48,900 रुपये असून विक्री किंमत 46,900 रुपये आहे. 64GB व्हेरिएंटची किंमत 41,900 रुपये आहे, 128GB ची किंमत 46,900 रुपये आणि 256GB ची किंमत 56,900 रुपये आहे. तसेच, Axis Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10 टक्के सूट दिली जात आहे.
