AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीतील सर्वोत्तम ब्रँडेड लॅपटॉप, ‘हे’ आहेत उत्तम पर्याय

50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम लॅपटॉप पर्याय देणारे अनेक ब्रँड आहेत. तर तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी, शिक्षण किंवा बेसिक मल्टीमीडिया वापरासाठी चांगला लॅपटॉप हवा असेल तर हे पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरतील.

50 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीतील सर्वोत्तम ब्रँडेड लॅपटॉप, 'हे' आहेत उत्तम पर्याय
laptops
| Edited By: | Updated on: Sep 17, 2025 | 1:54 PM
Share

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन प्रमाणेच अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप हे महत्वाचे डिव्हाइस झाले आहे. अगदी गेम खेळण्यापासून ते तुमचे आवडते शो पाहणे, नोट्स बनवणे किंवा असाइनमेंट पूर्ण करणे सर्वच कामासाठी लॅपटॉप महत्वाचा आहे. तसेच वर्क फॉर्म होम करताना स्वत:चा लॅपटॉप असणे महत्वाचे आहे. तर आपल्यापैकी अनेकजण लॅपटॉपच्या किंमती जास्त असल्याने खरेदी करणे टाळतात. पण बाजारात तसेच ई-कॉमर्स साइटवरही अगदी कमी किंमतीत ब्रँडेड लॅपटॉप देखील उपलब्ध आहे. तर आजच्या लेखात आपण 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या लॅपटॉपबद्दल जाणून घेणार आहोत.

ASUS Vivobook 15

बॅकलिट कीबोर्ड, 15.6-इंच FHD डिस्प्ले आणि कोपायलट+ फिचर्ससह, ASUS Vivobook 15 हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तर या लॅपटॉपचे वजन 1.7 किलो आहे आणि ते तुमच्या बॅकपॅकमध्ये सहज बसू शकते. हा लॅपटॉप इंटेल 12 जनरेशन Core i5 प्रोसेसर आणि 8 GB रॅमने सुसज्ज आहे. तर तुम्हाला हा लॅपटॉप 35,500 रूपयांना खरेदी करता येईल.

HP 15

एचपी 15 हा लॅपटॉप तुम्हाला 34,839 रूपयांना खरेदी करता येणार आहे. 1.59 किलो वजनाचा हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी आणखी एक उत्तम बजेट पर्याय आहे. 15.6 -इंच डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप इंटेलच्या 13 जनरेशन च्या कोर i3-1315U प्रोसेसरने सुसज्ज आहे. 8 जीबी डीडीआर 4 रॅम आणि 512 जीबी पीसीआयई एसएसडी उत्तम परफॉर्मसह सुसज्ज आहे. हा लॅपटॉप एचपी फास्ट चार्जसह देखील येतो आणि फक्त 45 मिनिटांत ५०% बॅटरी चार्ज करतो.

Dell Inspiron 3530

50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत दैनंदिन वापराचा लॅपटॉप हवा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Dell Inspiron 3530 हा आणखी एक बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. तर या लॅपटॉपची किंमत फक्त 38,090 रूपये आहे. 13 जनरेशच्या इंटेल कोर i3-1305U प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तर हा लॅपटॉप 8GB DDR4 रॅम आणि 512GB SSD सह येते.

हा १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. त्याचे वजन फक्त १.६२ किलो आहे. याशिवाय, हा लॅपटॉप विंडोज ११ होम, एमएस ऑफिस होम अँड स्टुडंट २०२१ आणि १५ महिन्यांच्या मॅकॅफी सबस्क्रिप्शनसह प्री-इंस्टॉल केलेला आहे.

Realme Book (Slim)

जर तुम्हाला अल्ट्रा-पोर्टेबल लॅपटॉप घ्यायचा असेल जो त्याचे काम चांगले करेल, तर Realme Book (Slim) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या लॅपटॉपचे वजन फक्त 1.38 किलो आहे आणि ते 11व्या जनरेशनच्या इंटेल कोर i5 प्रोसेसरवर चालते.

यात 8GB LPDDR4x रॅम आणि स्मूथ मल्टीटास्किंग आणि स्टोरेजसाठी 512GB SSD आहे. याशिवाय, यात 3:2 आस्पेक्ट रेशो आणि 400 nits च्या पीक ब्राइटनेससह 14-इंचाचा 2K डिस्प्ले आहे, जो तीक्ष्ण आणि चमकदार दृश्यांसह येतो. या लॅपटॉपची बॅटरी लाइफ 11 तास आहे. तर तुम्ही हा लॅपटॉप 43,016 रूपयांना खरेदी करू शकतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.