AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर चुकले, पण ChatGPT ने केला चमत्कार! वाचाल तर म्हणाल… काय असं कसं घडलं?

डॉक्टर अनेक, तपासण्याही खूप, पण आजाराचं नेमकं कारण काही केल्या सापडत नाहीये... अशावेळी जर तुमचा स्मार्टफोनमधला ChatGPT तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकला तर? हे काल्पनिक वाटत असलं तरी, अमेरिकेत एका महिलेसोबत हे खरं घडलंय! जिथे वैद्यकीय तज्ज्ञही बुचकळ्यात पडले, तिथे AI ने दिलेल्या एका क्ल्यूने चक्क तिचा जीव वाचवला! काय आहे ही थक्क करणारी गोष्ट ? एकदा नक्की वाचा...

डॉक्टर चुकले, पण ChatGPT ने केला चमत्कार! वाचाल तर म्हणाल... काय असं कसं घडलं?
Chat GptImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: May 12, 2025 | 1:37 AM

आजकाल AI आणि ChatGPT ची सगळीकडे चर्चा आहे. माहिती मिळवण्यापासून ते गप्पा मारण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करतो. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, काही लोकांसाठी हा AI चॅटबॉट अक्षरशः ‘देवदूत’ ठरला आहे! अमेरिकेतील एका महिलेचा दावा आहे की, जिथे अनेक डॉक्टर तिच्या आजाराचं नेमकं निदान करू शकले नाहीत, तिथे ChatGPT ने दिलेल्या माहितीमुळे तिचा जीव वाचला, कारण तिला कॅन्सर असल्याचं वेळीच कळालं!

काय आहे लॉरेनची कहाणी?

अमेरिकेतील लॉरेन बैनन नावाच्या महिलेला २०२४ च्या सुरुवातीला हाताची बोटं वाकवताना त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की हा ‘र्‍युमॅटॉइड आर्थरायटिस’ (Rheumatoid Arthritis) असू शकतो. पण त्यानंतर तिला अचानक पोटदुखी सुरू झाली आणि एका महिन्यात तिचं वजन जवळपास ६ किलो कमी झालं. डॉक्टरांना वाटलं ही ॲसिडिटीची समस्या आहे.

पण लॉरेनचं समाधान झालं नाही. तिने आपल्या लक्षणांबद्दल ChatGPT ला विचारलं. ChatGPT ने दिलेल्या माहितीनुसार, तिला ‘हाशिमोटो डिसीज’ (Hashimoto’s Disease) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हा एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते. लॉरेनच्या डॉक्टरांनी मात्र ही शक्यता नाकारली, कारण तिच्या कुटुंबात असा आजार कुणाला नव्हता. तरीही, लॉरेनने आग्रह धरला आणि थायरॉईडची अल्ट्रासाऊंड तपासणी केली. आणि काय आश्चर्य! तिच्या गळ्यात दोन कॅन्सरच्या गाठी आढळून आल्या! लॉरेन म्हणते, “जर मी फक्त डॉक्टरांवर अवलंबून राहिले असते, तर कदाचित कॅन्सर शरीरात पसरला असता. ChatGPT ने माझा जीव वाचवला.”

अजून एक उदाहरण: AI ने ओळखला ब्लड कॅन्सर?

पॅरिसमधील एका २७ वर्षीय महिलेसोबतही असाच काहीसा प्रकार घडला. तिला रात्री खूप घाम येणे आणि त्वचेला सतत खाज सुटणे असा त्रास सुरू झाला. अनेक टेस्ट्स करूनही डॉक्टरांना काही गंभीर आजार सापडला नाही. तिनेही ChatGPT कडे आपल्या लक्षणांबद्दल विचारलं. AI ने तिला ब्लड कॅन्सर असण्याची शक्यता दर्शवली. काही महिन्यांनी तिला थकवा आणि छातीत दुखायला लागल्यावर पुन्हा तपासण्या केल्या गेल्या. स्कॅनमध्ये तिच्या फुफ्फुसाजवळ एक मोठी गाठ दिसली आणि तिला हॉजकिन लिम्फोमा (Hodgkin Lymphoma) असल्याचं निदान झालं!

मग AI म्हणजे डॉक्टरचा पर्याय आहे का? अजिबात नाही!

या दोन्ही घटना थक्क करणाऱ्या असल्या तरी, एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. ChatGPT किंवा कोणताही AI टूल हा डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकांचा पर्याय अजिबात नाही. AI इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीच्या आधारे तुमच्या लक्षणांनुसार संभाव्य आजारांची शक्यता वर्तवू शकतो. तो तुम्हाला माहिती देऊ शकतो, काही प्रश्न विचारायला मदत करू शकतो. पण AI तुमची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करू शकत नाही, तुमच्या मेडिकल हिस्ट्रीचा सखोल विचार करू शकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो Diagnosis किंवा उपचार निश्चित करू शकत नाही.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.