एकाचवेळी 10 लोकांसोबत कॉन्फरन्स कॉल शक्य, जिओ ग्रुप टॉक लाँच

एकाचवेळी 10 लोकांसोबत कॉन्फरन्स कॉल शक्य, जिओ ग्रुप टॉक लाँच

मुंबई : रिलायंस जिओकडून अनेक नवीन नवीन ऑफर्स युजर्सला दिल्या जातात. यावेळीही रिलायंसने एक नवीन अॅप युजर्ससाठी लाँच केला आहे. ज्यामुळे आता जिओ युजर्स एकाचवेळी दहा लोकांसोबत ग्रुप कॉलिंग करु शकतात. रिलायंस जिओ तर्फे गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘जिओ ग्रुप टॉक’ हा नवीन अॅप अपलोड करण्यात आला आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स ग्रुप कॉन्फरंस कॉल करु शकतात. एकाचवेळी 10 लोकांसोबतही ग्रुप कॉल करता येणे शक्य आहे.

ज्या युजर्सकडे सिमकार्ड आहे. तेच फक्त या अॅपचा वापर करु शकतात. अॅप इनस्टॉल करताच युजर्सला जिओ नंबरच्या सहाय्याने व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागते. यासाठी तुमच्या फोनवर कॉलिंग आणि एसएमएस सर्व्हिस सुरु असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर अॅपचा वापर तुम्ही करु शकता.

जिओ ग्रुप टॉक मल्टीपल पार्टी कॉलिंग अॅप्लिकेशन आहे. यामध्ये एकाचवेळी 10 लोकांना कॉल केला जाऊ शकतो. कॉलिंगसोबत यामध्ये कॉन्फरंस कॉल शेड्यूलचा पर्याय ही दिला आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही एक-एक अॅड करण्यापेक्षा एकाचवेळी दहा लोकांना अॅड करुन कॉल करु शकता.

या अॅपच्या सहाय्याने कुणी कॉलर, व्हॉईस कॉलच्या दरम्यान कोणत्या दुसऱ्या युजर्सला अॅड किंवा रिमूव्ह करु शकता. यामध्ये लेक्चर मोडही दिला आहे. या मोडच्या दरम्यान फक्त एक युजर बोलू शकतो आणि बाकीचे फक्त ऐकू शकतात.

हा अॅप एचडी व्हॉईस कॉलिंगला सपोर्ट करतो. सुरुवातीला हा अॅप व्हॉईस कॉलिंगसाठी सुरु केला आहे, पण लवकरच व्हिडीओ कॉलिंग आणि चॅटिंगसारखे फीचर अॅड केले जातील.

सध्या हा अॅप ट्रायल पीरियडवर आहे. यावर टेस्टिंग सुरु आहे. लवकरच हा अॅप लाँच केला जाईल. आता सध्या अँड्रॉईड युजर हा जिओ ग्रुप टॉक अॅप डाऊनलोड करु शकतात. आईओएस युजर्ससाठी हा अॅप उपलब्ध नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI