Lloyd ने आणला ३० सेकंदात थंडावा देणारा ‘StunnAir’ AC! फीचर्स आणि किंमत जाणून थक्क व्हाल!
उन्हाळ्यात घराबाहेरून आलात आणि एसी सुरू केल्यावर रूम थंड व्हायची वाट बघत घाम पुसत बसला आहात? आता ही वाट बघण्याची गरज नाही! Lloyd ने असा एक जबरदस्त AC आणलाय, जो तुमच्या खोलीत प्रवेश केल्यावर अवघ्या ३० सेकंदात थंडगार हवा देण्यास सुरुवात करतो! एवढंच नाही, तर हा एसी इतका स्मार्ट आहे की तुम्ही खोलीत आहात हे ओळखून तो आपोआप चालू होतो. जाणून घ्या Lloyd च्या या नवीन 'StunnAir' एसीबद्दल!

उन्हाळ्याच्या दिवसांत थंड हवा मिळवण्यासाठी एसी हा एक महत्त्वाचा साथीदार असतो. पण काही वेळा एसी चालू केल्यावर खोली थंड होण्यासाठी लागणारा वेळ थोडा त्रासदायक वाटतो. जर तुम्हीही अशीच तक्रार करत असाल, तर Lloyd ने आणलेला नवीन StunnAir एसी .या एसीची खासियत अशी आहे की, तो केवळ ३० सेकंदात तुमच्या खोलीचं तापमान १८ डिग्री सेल्सियसपर्यंत कमी करू शकतो.
‘StunnAir’ मध्ये खास काय आहे?
1. AI ह्यूमन डिटेक्शन: StunnAir एसीमध्ये एक स्मार्ट ह्यूमन डिटेक्शन सिस्टीम आहे. खोलीत एसी असलेल्या व्यक्तीला सेन्सर ओळखतो आणि स्वतःच एसी सुरू करून थंडावा सुरू करतो. बटण दाबण्याचीही आवश्यकता नाही!
2. व्हॉइस कमांड: रिमोट शोधण्यात कंटाळा आला आहे का? तर चिंता करू नका! StunnAir एसीला तुम्ही तुमच्या आवाजाने चालू, बंद किंवा सेटिंग्स बदलू शकता.
3. 3D एअरफ्लो: खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात थंड हवा पोहचवण्यासाठी या एसीमध्ये 3D एअरफ्लो सिस्टीम आहे.
4. इनबिल्ट एअर प्युरिफायर: StunnAir एसीमध्ये एक एअर प्युरिफायर आहे, जो थंड हवेसोबत शुद्ध हवा देखील प्रदान करतो.
5. अॅम्बियंट लाईट: रात्रीच्या वेळी मंद आणि सुखद प्रकाश देणारी अॅम्बियंट लाईट यामध्ये आहे, जी खोलीला आरामदायक बनवते.
6. कडक उन्हाळ्यातही कार्यक्षम: StunnAir एसी ६० डिग्री सेल्सियस तापमानातही उत्तम कार्य करतो. यामुळे हा एसी भारताच्या कोणत्याही भागात वापरता येऊ शकतो.
Lloyd च्या नवीन एसीच्या किमती
StunnAir स्प्लिट एसी (1.5 टन, 5-स्टार): ₹ ७४,०३२
Stellar सीरीज एसी (1.5 टन, 3.5 स्टार): ₹ ६६,९९१ पासून
Stylus स्प्लिट एसी (1 टन, 3-स्टार): ₹ ४०,९९० पासून
Lloyd च्या आनखी नवीन उत्पादनांची रेंज
StunnAir एसी व्यतिरिक्त, Lloyd ने त्यांची एसी, रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि वॉशिंग मशीन्सची एक आधुनिक रेंज बाजारात आणली आहे. त्यात Stylus, Stellar, Masterpiece, Luxuria सीरीजमधील प्रगत एसी मॉडेल्स, Kolor सीरीजमधील स्टायलिश फ्रिज, ५५-७५ इंचाचे Mini LED TV आणि नवीन फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स समाविष्ट आहेत.
