Delete Gmail Emails : सततच्या आणि बिनकामी मेलने डोकं उठलंय? ही एक ट्रीक आणि विषय संपवा

नको असलेल्या मेल्सच्या मुबलक प्रमाणामुळे फिशिंग स्कॅमचाही धोका निर्माण होतो. ही समस्या पाहता, आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या मेल्सपासून एकाच वेळी सुटका मिळवू शकता. 

Delete Gmail Emails : सततच्या आणि बिनकामी मेलने डोकं उठलंय?  ही एक ट्रीक आणि विषय संपवा
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 9:30 PM

मुंबई : बर्‍याच वेळा तुमचा मेलचा इनबॉक्स अनावश्यक मेल्सने भरलेला असतो, त्यामुळे तुमचं महत्त्वाच्या मेल्सकडेही लक्ष जात नाही. अशा परिस्थितीत नको असलेल्या मेल्सच्या मुबलक प्रमाणामुळे फिशिंग स्कॅमचाही धोका निर्माण होतो. ही समस्या पाहता, आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या मेल्सपासून एकाच वेळी सुटका मिळवू शकता.

या प्रकरणात, आपण नको ते मेल सेंड करणाऱ्याला ब्लॉक करू शकता. याशिवाय, ज्या पेजवरून संबंधित मेल्स येत आहेत त्या पेजला अनफॉलो करा किंवा ते सर्व फिल्टर करा. फिल्टर करून, तुम्ही हे मेल एकाच वेळी मोठ्या संख्येने हटवू शकता. पाठवणाऱ्याला ब्लॉक करण्यासाठी किंवा एकाच वेळी अनेक मेल हटवण्यासाठी या युक्त्या फॉलो करा.

– Gmail वर स्पॅम मेल कसे ब्लॉक करावे

1. यासाठी प्रथम तुमचे जीमेल खाते उघडा.

2. त्यानंतर तुम्हाला ब्लॉक करायचा असलेला स्पॅम मेल निवडा.

3. येथे तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या More च्या पर्यायावर क्लिक करा.

4. More या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ब्लॉकवर क्लिक करा.

5. या प्रक्रियेनंतर, पाठवणाऱ्याचे सर्व मेल स्पॅम फोल्डरमध्ये जातील.  त्यानंतर तेथूनही हटवा.

सर्व स्पॅम किंवा जंक मेल एकाच वेळी कसे हटवायचे

1. यासाठी प्रथम कोणत्याही ब्राउझरवर जीमेल ओपन करा.

2. इनबॉक्स किंवा इतर श्रेणीच्या शोध बारमध्ये, Urid हे लेबल टाइप करा आणि त्यावर क्लिक करा.

3. येथे तुम्ही रीड लेबल शोधून ओन्ली रीड मेल्स देखील निवडू शकता.

4. यानंतर, सिलेक्ट ऑल बॉक्सच्या पर्यायावर क्लिक करा आणि सर्व संभाषणे निवडा.

5.  येथे डिलीट ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला या फालतू मेल्सपासून मुक्ती मिळेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.