AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smartphone : स्मार्टफोनमधून चुकून फोटो डिलीट झालाय? चिंता नको अशा पध्दतीने करा रिकव्हर

अनेकदा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा कार्यक्रमाला जातो तेव्हा युजर्स फोनमध्ये त्या खास क्षणाचे छायाचित्र संग्रहीत करीत असतात. त्याच वेळी काही चुकांमुळे स्मार्टफोनमध्ये काढलेले छायाचित्रे डिलीट होतात अशा परिस्थितीत, लोक खूप अस्वस्थ होतात आणि फोनमध्ये पुन्हा तो डाटा रिकव्हर करण्यासाठी सर्व पर्याय शोधतात. जर तुम्ही देखील याच समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे डिलीट केलेले फोटो परत मिळवू शकता.

Smartphone : स्मार्टफोनमधून चुकून फोटो डिलीट झालाय? चिंता नको अशा पध्दतीने करा रिकव्हर
smart phone Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2022 | 4:04 PM
Share

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smartphone) आहे. आजच्या युगात स्मार्टफोन माहिती नसेल किंवा वापरत नसलेला एकही व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. स्मार्टफोन हा प्रत्येच्या जिव्हाळ्याचा घटक बनला असून तो एक अविभाज्य भाग आहे. आपण आपल्या अनेक लहान मोठ्या आठवणी स्मार्टफोनमध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. आजकाल अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी लोकांच्या गरजा ओळखून मोबाईलमध्ये दमदार कॅमेरे (Cameras) दिलेले आहेत. त्याचा वापर करुन युजर्स आपल्या सर्व महत्वाच्या बाबी फोटोच्या माध्यमातून स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु अनेकदा स्मार्टफोनमधील काही आवश्‍यक फोटो डिलीट होतात. अशा वेळी युजर्सचा मोठा हिरमोड होत असतो. महत्वाच्या आठवणी पुसल्या जात असल्याने आता हा डाटा कसा रिकव्हर (Recover) करावा? असा प्रश्‍न निर्माण होत असतो.

  1.  जर तुम्हाला तुमच्या फोनमधून डिलिट झालेले फोटो रिकव्हर करायचे असतील तर तुम्ही यासाठी डिस्क रिकव्हरी टूलची मदत घेऊ शकता. Google Play Store वर तुम्हाला अनेक डिस्क रिकव्हरी टूल्स सहज सापडतील.
  2. तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्ही चुकून डिलीट झालेले फोटो सहज रिकव्हर करू शकता. दरम्यान, डिस्क रिकव्हर टूल डाउनलोड केल्यानंतर त्याची विश्वसनीयता तपासणेही अत्यंत आवश्‍यक असते.
  3. इंटरनेटच्या जगात अनेक फेक डिस्क रिकव्हरी टूल्स उपलब्ध आहेत, जे फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा खासगी डेटा लीक होऊ शकतात. अशा परिस्थितीत, ते डाउनलोड करताना, त्याची विश्वासार्हता तपासा.
  4. अनेकदा मोबाईलमध्ये चुकून फोटो डिलीट होतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडून कोणताही फोटो चुकून डिलीट झाला असेल तर तो फोटो आपल्या अल्बमच्या रिसेंटली डिलीट सेक्शनमध्ये असू शकतो. तेथून डिलीट केलेला फोटो तुम्ही सहज रिकव्हर करू शकता.
  5. कुठलाही फोटो चूकून डिलीट झाल्यास तुम्ही तो रिकव्हर करण्यासाठी मानांकित टूल्सचा वापर करणे आवश्‍यक ठरते. किंवा एखाद्या मोबाईल दुकानात जावूनही तुम्ही तो डाटा रिकव्हर करु शकतात.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.