AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्याच्या पठ्ठ्याची उद्योगात मुकेश अंबानींसोबत स्पर्धा, जिओ मार्टला टक्कर देणारं ‘दुकान’ अ‍ॅप

जिओ मार्ट अ‍ॅपला टक्कर देणारं महाराष्ट्राच्या साताराच्या एका पठ्ठ्याने तयार केलेलं दुकान अ‍ॅपला दुकानदारांनी जास्त पसंती दिली आहे (Dukaan app tough competition to Jio Mart).

साताऱ्याच्या पठ्ठ्याची उद्योगात मुकेश अंबानींसोबत स्पर्धा, जिओ मार्टला टक्कर देणारं 'दुकान' अ‍ॅप
| Updated on: Jan 04, 2021 | 10:59 PM
Share

मुंबई : लोकल दुकानदारांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ मार्ट अ‍ॅपची स्थापना केली. मात्र, हे अ‍ॅप दुकानदारांना फारसं जवळचं वाटलं नाही. याउलट या अ‍ॅपला टक्कर देणारं महाराष्ट्राच्या साताराच्या एका पठ्ठ्याने तयार केलेलं दुकान अ‍ॅपला दुकानदारांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे हे अ‍ॅप मुकेश अंबानींच्या जिओ मार्ट अ‍ॅपला टक्कर देत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही (Dukaan app tough competition to Jio Mart).

खरंतर जिओ मार्ट अ‍ॅपबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. ऑर्डर दिली तर वस्तूंची डिलिव्हरी होत नाही किंवा परस्पर ऑर्डर रद्द होते. त्यामुळे अनेकांनी जिओ मार्ट अ‍ॅपकडे पाठ फिरवली आहे. याउलट दुकान अ‍ॅपची गाडी मार्केटमध्ये सुसाट धावत आहे. खरंतर या अ‍ॅपची निर्मिती सातारा जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील तरुणाने केली आहे. या तरुणाचं नाव सुमित शाह असं आहे. सुमितचं हे दुकान अ‍ॅप अनेकांच्या पसंतीत पडलं आहे.

“दुकान अ‍ॅपने लहान आणि मध्यमवर्गीय उद्योगपतींचा व्यवसाय वाढण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खरंतर या अ‍ॅपने दुकानदारांच्या प्रश्न आणि समस्या समजल्या आहेत. लोकांना तांत्रिकदृष्ट्या कशाप्रकारे सोप्य सुविधा देता येईल, याकडे पाहिलं आहे. त्यामुळे दुकानदारांचा या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे”, अशी प्रतिक्रिया सुमित शाहने दिली.

दुकान अ‍ॅपच्या यशस्वी घोडदौड विषयी सांगायचं झाल्यास तर सहा महिन्यात तब्बल 4.3 मिलियन लोकांनी म्हणजेच जवळपास 43 लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. या अ‍ॅपने स्थानिक पातळीवरील दुकानदारांना डिजीटल युगाबाबत प्रशिक्षण दिलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलच्या मदतीने दुकानदार आपल्या वस्तू सोशल मीडियावर शेअर करुन व्यवसाय करु शकतो.

अ‍ॅपचा वापर कसा करायचा?

या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी हे अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर दुकानदाराने आपला व्यवसाय नोंद करावा. या प्रकियेला 30 सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. या अ‍ॅपवर प्रत्येक दुकानदाराला एक कस्टमर स्टोअर लिंक मिळते, या लिंकवर दुकानदार आपल्या सर्व वस्तूंविषयी माहिती देऊ शकतात. स्टोअरची लिंक दुकानदार व्हाट्स अ‍ॅप किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईट्सवर शेअर करुन व्यवसाय करु शकतात.

या अ‍ॅपचा उपयोग हा छोट्या दुकानदारांपासून मोठमोठ्या रेस्टॉरंट, सोने आणि फर्निचरच्या दुकानांसाठी होऊ शकतो. इथे दुकानदार फळं, भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही विक्री करु शकतात (Dukaan app tough competition to Jio Mart).

या अ‍ॅपवर सध्या 30 लाखांपेक्षा जास्त ऑनलाईन स्टोअर आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. या सर्व प्रोडक्ट्सला विविध जवळपास 40 व्यवसायांमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपद्वारे दुकानदारांना आतापर्यंत जवळपास 9 लाखांपेक्षा जास्त ऑर्डर आल्या आहेत.

हेही वाचा : WhatsApp लवकरच अपडेट होणार, यूजर्सला मिळणार ‘हे’ सहा अनोखे फीचर्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.