Facebook युजर्स पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर, अनेकांची फसवणूक, टेक कंपनी अ‍ॅक्शन मोडमध्ये

तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हा पाकिस्तानी हॅकर्सनी फेसबुकचा वापर अफगाणिस्तानमधील लोक आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी केला होता. फेसबुकने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानमधील हॅकर्सच्या अशा एका ग्रुपला हटवलं आहे.

Facebook युजर्स पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर, अनेकांची फसवणूक, टेक कंपनी अ‍ॅक्शन मोडमध्ये
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 12:45 PM

मुंबई : तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हा पाकिस्तानी हॅकर्सनी फेसबुकचा वापर अफगाणिस्तानमधील लोक आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी केला होता. फेसबुकने मंगळवारी सांगितले की, त्यांनी पाकिस्तानमधील हॅकर्सच्या एका ग्रुपला हटवलं आहे जो अफगाणिस्तानमधील लोकांना टार्गेट करत होता. (Facebook disrupts Pakistani hacking group targeting Afghan users, meta in action mode)

हॅकर्सच्या एका ग्रुपने महिलांच्या नावाने अकाऊंट तयार केले. रोमँटिक मेसेजेस करुन लोकांना वेगवेगळी आमिषं दाखवून हॅकर्सनी युजर्सना भुरळ पाडण्याचे काम केले. ग्रुप चॅट अॅप्स डाउनलोड करण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. साइडकॉपी म्हणून ओळखला जाणारा हा ग्रुप पूर्वीच्या अफगाण सरकार, काबूलमधील लष्करी आणि Law Enforcement Agencies शी संबंधित लोकांना लक्ष्य करत होता.

फेसबुकने यूजर्सना अलर्ट करताना म्हटले आहे की, “आम्ही हॅकर्सचे अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट केले आहेत. त्यांच्या डोमेनवर आमच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यावर बंदी घातली आहे. आम्ही आमच्या उद्योगातील साथीदार, सुरक्षा संशोधक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींशी माहिती शेअर केली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या संस्था किंवा कंपन्यांना या हॅकर्सनी लक्ष्य केले आहे किंवा जे त्यांच्या निशाण्यावर होते, त्यांना आम्ही अलर्ट केले आहे.

पाकिस्तानी हॅकर्सकडून बनावट अॅपद्वारे हेराफेरी

पाकिस्तानमधील या हॅकर्सनी बनावट अॅप स्टोअर चालवले (fake app store) आणि वैध वेबसाइट्समध्ये छेडछाड केली, जेणेकरून लोकांच्या फेसबुक क्रेडेन्शियल्समध्ये फेरफार करता येईल.

WhatsApp युजर्स स्कॅमर्सच्या निशण्यावर

Facebook च्या मालकीचे मेसेजिंग अॅप WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि आवडते मोबाईल अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अनव्हेरीफाईइड लिंक्स आणि मेसेजद्वारे लोकांना फसवण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. व्हॉट्सअॅपवर सुरु असलेला एक नवीन स्कॅम उघडकीस आला आहे. या स्कॅमला “फ्रेंड इन नीड” स्कॅम (Friend In Need Scam) असे म्हटले जात आहे. यामध्ये युजर्सना त्यांच्या मित्रांना मदतीची गरज असल्याचे मेसेज आल्याची तक्रार केली आहे. यूकेमधील अनेक युजर्सना असे मेसेजेस आले आहेत.

या स्कॅमध्ये स्कॅमर्स व्हॉट्सअॅप युजर्सना त्यांच्या मित्राच्या नावाने मेसेज करतात की ते विदेशात आहेत आणि तिथे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मेट्रोच्या अहवालानुसार, अलीकडेच एका 53 वर्षीय नर्सला एका मैत्रिणीचा मेसेज मिळाला, ज्यात म्हटले होते की, तिचा मुलगा अडचणीत आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. त्या नर्सने कोणताही विचार न करता पैसे पाठवले आणि 2,500 पाउंड गमावले. या स्कॅमर्सना लोकांच्या कमजोरीची जाणीव आहे आणि ते जाणूनबुजून अशा लोकांना लक्ष्य करतात ज्यांचा स्वभाव मदत करणारा आहे.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Facebook disrupts Pakistani hacking group targeting Afghan users, meta in action mode)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.