फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन, कारण अस्पष्ट

फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन, कारण अस्पष्ट

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप या फेसबुकच्या तीन जायंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना अडथळे येत असून, तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचे म्हटले जाते आहे. ट्विटरवर #FacebookDown आणि #Instagramdown असे हॅशटॅगही जगभरात ट्रेण्ड होत आहेत.

फेसबुक संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून डाऊन असल्याचे डाऊन डिटेक्टर डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटलं आहे. युरोप, साऊथ-एशिया आणि नॉर्थ अमेरिका या भागात फेसबुक डाऊन आहे.

फेसबुकवर जगभरातील मोठा वर्ग अॅक्टिव्ह असतो. अनेकांच्या पोस्ट शेअर होत नाहीत, तर काहींचे फोटो, व्हिडीओ अपलोड होत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला आपल्या अॅपमध्ये काही अडथळा आहे का, असे अनेकांना वाटत होते. मात्र, ट्विटरवर फेसबुक डाऊन असल्याचे हॅशटॅग ट्रेण्ड झाले. त्यामुळे हे तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचे लक्षात आले.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप डाऊन असल्याने ट्विटरवर अनेक विनोदही शेअर केले जात आहेत. त्यापैकी काही निवडक विनोद :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI