AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाओमीच्या ‘या’ नवीन 5G फोनच्या लाँचपूर्वीच ‍फिचर्स आले समोर, 8500mAh बॅटरीसह मोठ्या अपग्रडेचा समावेश

Xiaomiच्या या नवीन स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी त्याचे फिचर्स समोर आले आहेत, ज्यामध्ये ड्युअल 200MP कॅमेरे आणि 8500mAh बॅटरीसारख्या मोठ्या अपग्रेडचा समावेश आहे. चला तर मग शाओमीच्या कोणत्या फोनची फिचर्स लीक झालेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

शाओमीच्या 'या' नवीन 5G फोनच्या लाँचपूर्वीच ‍फिचर्स आले समोर, 8500mAh बॅटरीसह मोठ्या अपग्रडेचा समावेश
shaomi
| Edited By: | Updated on: Jul 07, 2026 | 3:51 PM
Share

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. कोणता फोन घ्यावा आणि कोणता नाही यात ग्राहक सम्रभांत असतात. अशातच शाओमी कंपनीने सध्या शाओमी 18 स्मार्टफोन सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच शाओमी 18 प्रो सिरीजमधील प्रमुख डिस्प्ले आणि कॅमेरा अपग्रेड्सबद्दल माहिती समोर आली आहे. आता या सिरीजच्या मॅक्स मॉडेल म्हणजेच शाओमी 18 प्रो मॅक्सबद्दल नवीन माहिती ऑनलाइन समोर आली आहे.

एका टिपस्टरने दिलेल्या नवीन लीकनुसार, हा फोन त्याच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत इमेजिंग, बॅटरी क्षमता आणि डिस्प्ले डिझाइनच्या बाबतीत लक्षणीयरीत्या बदलेला असू शकतो. इतकेच नव्हे तर या नवीन मॅक्स मॉडेलमध्ये ड्युअल 200-मेगापिक्सेल कॅमेरे आणि 8500mAh बॅटरी देखील असू शकते. चला जाणून घेऊया की हे नवीन मॉडेल कोणते खास फिचर्स देणार आहेत.

Xiaomi 18 Pro Max ची संभाव्य फिचर्स

शाओमीच्या Xiaomi 18 Pro Max या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, टिपस्टरने खुलासा केला आहे की, शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये मोठ्या आणि गोलाकार कडा असलेला कस्टम फ्लॅट डिस्प्ले असू शकतो. फोनच्या सर्व बाजूंना एकसारख्या पातळ बेझल्स असण्याची शक्यता आहे. तसेच, या डिव्हाइसमध्ये 6.9-इंचाचा 2K OLED डिस्प्ले असण्याचीही शक्यता आहे.

Xiaomi 18 Pro Max चे संभाव्य कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 18 Pro Max चे सर्वात मोठे फिचर म्हणजे त्याचा कॅमेरा असू शकतो. माहिती देणाऱ्याच्या मते, या फोनमध्ये LOFIC टेक्नॉलॉजीसह 200-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असू शकतो. यामुळे डायनॅमिक रेंज सुधारेल आणि विशेषतः कमी प्रकाशाच्या परिस्थितीत देखील उत्तम फोटो काढता येतील.

शिवाय या डिव्हाइसमध्ये मॅक्रो फोटोग्राफी सपोर्टसह दुसरा 200-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देखील असू शकतो. पूर्वीच्या अहवालांनुसार, 18 प्रो मॅक्समध्ये ड्युअल 200-मेगापिक्सलचे रियर कॅमेरे असू शकतात.

या फोनमध्ये 8500mAh पर्यंतची मोठी बॅटरी असण्याचीही शक्यता आहे. तसेच यात 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे

Follow Us