Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

| Updated on: Mar 09, 2021 | 7:44 AM

फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निव्हल सेल (Flipkart Smartphone Carnival Sale) लाईव्ह करण्यात आला आहे. आयफोनवर 10000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट
Iphone XR
Follow us on

मुंबई : फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निव्हल सेल (Flipkart Smartphone Carnival Sale) लाईव्ह करण्यात आला आहे. हा सेल 12 मार्चपर्यंत सुरु असेल. या सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोन्सवर विविध प्रकारचे डिस्काऊंट मिळवू शकतात. तसेच तुम्ही जर Axis Bank च्या कार्डद्वारे पेमेंट करत असाल आणि तुम्ही 5000 किंवा त्याहून अधिक शॉपिंग केली तर तुम्हाला अजून काही कॅशबॅक ऑफर मिळतील. तसेच या सेलमध्ये तुम्हाला आयफोनवर (Iphone) 10 हजार रुपयांची सूट मिळेल. Axis डेबिट आणि क्रेडिट द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सूट दिली आहे. (Flipkart smartphone carnival Sale goes live, Get discounts on Iphone, Poco, Realme and Motorola phones)

या स्मार्टफोन्सवर सूट

पोको X3 (Poco X3) चं 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवालं मॉडल तुम्ही 15,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करु शकता. तर या फोनचं 8 जीबी रॅमवालं मॉडल 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच्या 64 जीबी वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.

एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 15,150 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. पोको C3 (Poco C3) या स्मार्टफोनची सेलमधील किंमत 10,000 रुपयांहून कमी आहे. तसेच या फोनचं 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेलं मॉडल 6,999 रुपयांमध्ये तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं मॉडल 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

रियलमी नार्झो 30A (Realme Narzo 30A)

रियलमी नार्झो 30A हा स्मार्टफोन तुम्ही 10,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करु शकता. या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमती अनुक्रमे 8999 रुपये आणि 9999 रुपये अशा आहेत.

मोटोरोला मोटो G 5G

मोटोरोला मोटो G 5G (Motorolo Moto G 5G) हा देशात उपलब्ध असलेला स्वस्तातला 5G स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन 18,999 रुपये या किंमतीत उपलब्ध आहे. अॅक्सिस बँक युजर्सना यावर 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

आयफोन XR आणि SE

आयफोन XR (Iphone XR) आणि आयफोन SE (Iphone SE) बद्दल बोलायचे झाल्यास आयफोन XR 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. अॅक्सिस बँक युजर्स हा स्मार्टफोन 37,749 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर आयफोन SE 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अॅक्सिस बँक यूजर्स हा स्मार्टफोन 28,749 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

इतर बातम्या

देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

Oneplus चा मोठा निर्णय, ‘हे’ गॅजेट्स बंद करणार, परवडणाऱ्या दरात ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीज खरेदीची शेवटची संधी

लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2, या फोनमध्ये काय असेल खास

(Flipkart smartphone carnival Sale goes live, Get discounts on Iphone, Poco, Realme and Motorola phones)