PUBG New State थोड्याच वेळात लाँच होणार, कसा डाऊनलोड कराल नवीन गेम?

कोरियन कंपनी क्राफ्टनने तयार केलेला PUBG न्यू स्टेट (PUBG: New State) मोबाईल गेम आज भारतासह जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये लॉन्च होणार आहे.

PUBG New State थोड्याच वेळात लाँच होणार, कसा डाऊनलोड कराल नवीन गेम?
Pubg New State
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:15 PM

मुंबई : कोरियन कंपनी क्राफ्टनने तयार केलेला PUBG न्यू स्टेट (PUBG: New State) मोबाईल गेम आज भारतासह जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये लॉन्च होणार आहे. हा गेम अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्हींसाठी सादर केला जाईल. हा गेम PUBG मोबाईल सारखाच आहे, ज्यामध्ये अनेक नवीन एलिमेंट्स पाहायला मिळतील, जे गेमर्सना अधिक चांगला अनुभव देतील. PUBG: New State हा गेम आधीच रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये Android आणि iOS दोन्ही युजर्स रजिस्ट्रेशन करू शकतीत. (PUBG New State game launching today, know How to download )

गेम डेव्हलपर क्राफ्टन अनेक दिवसांपासून PUBG New State चा टीझर रिलीज करत आहे. आता हा गेम जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. PUBG New State ही सध्याच्या PUBG मोबाइल गेमची भविष्यकालीन आवृत्ती असेल.

गेल्या वर्षी PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पबजी हा गेम या वर्षी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या नावाने भारतात लाँच करण्यात आला. Android युजर्स Google Play Store वरून हे दोन्ही गेम डाउनलोड करू शकतील, तर iPhone वापरकर्त्यांना Apple App Store वर जावे लागेल, परंतु पबजी न्यू स्टेट केवळ प्री रजिस्ट्रेशन केलेल्या निवडक युजर्ससाठी आहे.

PUBG New State डाऊनलोड करताना सावधानता बाळगा

PUBG New State ची APK फाईल अद्याप अधिकृतपणे जारी करण्यात आलेली नाही. परंतु काही युजर्स, ज्यांच्याकडे गेम चालवण्यासाठी आधीच एपीके आणि ओबीबी फाइल्स आहेत, ते डाउनलोड करण्याचा पर्याय देत आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी लिंकद्वारे गेम डाउनलोड न करण्याचा सल्ला देऊ. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

PUBG New State ची खासियत

PUBG New State 2050 च्या टाइमलाइनवर आधारित आहे आणि यात PUBG मोबाइल किंवा BGMI पेक्षा चांगले ग्राफिक्स आणि गेम-प्ले आहे. या नवीन मोडमध्ये अनेक वाहने, ड्रोन आणि इतर गोष्टींना एलईडी लॅम्प बसवण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 4 मॅप्स देण्यात आले आहेत. नवीन गेममध्ये चांगले वेपन कस्टमायझेशन, नवीन वाहने, ड्रोन शॉप आणि इतर कंटेंट समाविष्ट करण्यात आला आहे.

Team Deathmatch Mode : यामध्ये नवीन स्टेशन मॅप पर्याय असेल. अनेक क्रेट्स आणि रखडलेल्या ट्रेनचे डब्बे आहेत. यामध्ये तुम्हाला गेम खेळायचे आहेत. हा मॅप फाईटसाठी आहे. यामध्ये दूरपर्यंत मारा करणाऱ्या रायफल्स क्वचितच पाहायला मिळतील. हा गेम केवळ 10 मिनिटे खेळता येतो. यामध्ये 40 किलिंग करणारा विजेता असेल.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(PUBG New State game launching today, know How to download )

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.