Samsung : दीड लाखांचा साउंडबार मोफत मिळवा, सॅमसंगकडून बंपर धकामा ऑफर

नवीन नियो क्यूलेड टीव्ही सामान्य टीव्हीपेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने डिझाइन करण्यात आला आहे. हे गेम कंसोल, व्हर्च्युअल प्ले ग्राउंडसह अन्य विविध आकर्षक फिचर्सने सुसज्ज आहे. हे क्यूलेड तुमच्या घराला अगदी शोभून दिसेल, शिवाय याच्या खरेदीवर कंपनीकडून विविध आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत.

Samsung : दीड लाखांचा साउंडबार मोफत मिळवा, सॅमसंगकडून बंपर धकामा ऑफर
SamsungImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:36 PM

मुंबई : सॅमसंगने (Samsung) आपले अल्ट्रा-प्रिमियम 2022 नियो क्यूलेड 8के आणि निओ क्यूलेड टीव्ही (Neo qled TV) बाजारपेठांमध्ये दाखल केले आहे. या टीव्हीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, यात, पिक्चर क्वालिटी आणि चांगल्या ऑडिओला जास्त फोकस करण्यात आले आहे. साउंड क्वालिटीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नवीन नियो क्यूलेड टीव्हीची रेंज ही इतर सामान्य टीव्हीपेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने डिझाइन करण्यात आलेली आहे. हे गेम कंसोल, व्हर्च्युअल प्ले ग्राउंडसह (playground) अन्य विविध आकर्षक फिचर्सने सुसज्ज आहेत. शिवाय हे क्यूलेड तुमच्या घराला अगदी शोभून दिसते. दरम्यान, या माध्यमातून तुम्ही घरात स्मार्ट हब बनवू शकतात, यामुळे घरातील सदस्यांची कार्यक्षमताही वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

हे आहेत फिचर्स

नवीन नियो क्यूलेड लाइन-अपमध्ये क्वांटम मिनी एलईडीसह क्वांटम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी प्रोचा वापर करण्यात आला आहे. हे एलईडी सामान्य एलईडीपेक्षा 40 पट लहान आहेत. त्यांची ल्युमिनेन्स स्केल देण्याची क्षमता अधिक चांगली असून डिसप्लेच्या ब्राइटनेसला अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यातही ते चांगले काम करतात. शेप अ‍ॅडॉप्टिव लाइट कंट्रोल चित्रातील विविध वस्तू अचूक पारखते. नियो क्यूलेड 8के मेध्ये रिअल डेप्थ एन्हान्सरसह न्यूरल क्वांटम प्रोसेसर आहे, जे आर्टिफीशियल इंटेलिजेंसवर आधारीत डीप लर्निंगच्या मदतीने वस्तू ठरवतात. अधिक चांगला अनुभव देण्यासाठी, निओ क्यूलेड आय कम्फर्ट मोडसह येतो, जो त्यातील सेन्सरच्या मदतीने स्क्रीनची चमक आणि टोन स्वयंचलितपणे वाढवतो. जेव्हा सभोवतालचा प्रकाश बदलतो, तेव्हा स्क्रीन कमी प्रकाश देऊ लागते.

या ठिकाणी उपलब्धता

नियो क्यूलेड 8के लाइन अपमध्ये 65 इंच ते 85 इंच स्क्रीन आकारासह तीन सिरीज असतील. निओ क्यूलेड टीव्ही 50 इंच ते 85 इंचांपर्यंत स्क्रीन आकारासह तीन सिरीजमध्ये उपलब्ध असेल. नियो क्यूलेड टीव्हीची नवीन रेंज रिटेल स्टोअरमध्ये आणि फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉपवर ऑनलाइन मिळेल.

मर्यादीत ऑफर

मर्यादित ऑफरमध्ये 19 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान नियो क्यूलेड 8के टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,49,000 किमतीचा सॅमसंग साउंडबार आणि 8,900 किमतीचा स्लिमफिट कॅम पूर्णपणे मोफत मिळणार आहे. नियो क्यूलेड टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 8,900 रुपयांचा स्लिमफिट कॅम मोफत मिळेल. जे ग्राहक निओ क्यूलेड 8के टीव्ही प्री-रिझर्व्ह करतील त्यांना 10,000 रुपयांची सूट मिळेल.

नियो क्यूलेड 8के टीव्ही QN900B (85-इंच), QN800B (65 आणि 75 इंच), QN700B (65 इंच) मॉडेलमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत 3,24,990 पासून सुरू होईल. निओ क्यूलेड टीव्ही QN95B (55, 65 इंच), QN90B (85, 75, 65, 55, 50 इंच), QN85B (55, 65 इंच) मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 1,14,990 रुपयांपासून सुरू होईल.

इतर बातम्या :

Vivo X80 Series : वनप्लस 10 प्रो, शाओमी 12 प्रो नंतर आता विवोचा नवा स्मार्टफोन… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

OTT Platform | नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅन ? परवडणाऱ्या दरात मिळणार सबस्क्रिप्शन

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.