लसवंत व्हा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Google मैदानात, लसीकरणासाठी जनजागृती

लोकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी Google ने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:23 PM, 1 May 2021
लसवंत व्हा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Google मैदानात, लसीकरणासाठी जनजागृती
Google Doodle

मुंबई : जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान (Second wave of Corona Pandemic) घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लोकांनी या नियमांचे पालन करावे, यासाठी Google ने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. (Get vaccinated, Google Doodle urges people to take COVID-19 vaccine)

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. जगभरातील बहुतांशी देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लोकांनी लस टोचून घ्यावी, यासाठीदेखील लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. विविध देशांची सरकारने त्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लसीकरणासाठीदेखील गुगलने जनजागृती सुरु केली आहे.

लोकांनी मास्कचा वापर करावा, यासाठी गुगलने एक डुडल पोस्ट केलं आहे. हे डुडल तुम्ही गुगलच्या होमपेजवर (मुखपृष्ठावर) पाहू शकता. या डुडलद्वारे गुगलने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी गुगलने डुडलचा पर्याय निवडला आहे. या डुडलवर क्लिक करताच COVID-19 च्या लसीकरणाबाबतची माहिती समोर येते.

Google ची ही नवीन डेव्हलपमेंट भारतातील COVID-19 व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह सुरु करण्याबाबत आहे. आजपासून भारतात 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्या ही मोहीम देशातील 6 राज्यांमध्ये सुरु झाली आहे. इतर राज्यांमध्येदेखील ही मोहीम सुरु केली जाणार आहे. परंतु ही गोष्ट लशींच्या उपलब्धेतवर अवलंबून आहे.

अनेक देशांसाठी डुडल

COVID-19 वरील लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने डुडल बनवलं आहे. हे डुडल अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये उपलब्ध आहे. लस घेणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गुगल फेस मास्क आणि बँडेजसह लोकांना जागरूक करत आहे.

रशियाच्या Sputnik Vची पहिली खेप आली

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान हाती घेण्यात आलं आहे. देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने भारताने रशियाकडून स्पुतनिक व्ही या लसींचा साठा मागवला असून या लसींची पहिली खेप भारतात आली आहे. दीड लाख स्पुतनिक व्ही लसीचे डोस भारतात दाखल झाले असून हैदराबाद विमानतळावर लसी घेऊन आलेले विमान पोहोचले आहे. रशियाकडून या महिन्यात भारताला आणखी 30 लाख लस मिळणार आहेत.

भारतात दरवर्षी 85 कोटी डोस तयार होणार

भारतात स्पुतनिक व्हीचे दरवर्षी 85 कोटीहून अधिक डोस तयार करण्यात येणरा आहेत, असं रशियाने म्हटलं आहे. या व्हॅक्सिनचे वैज्ञानिक परीक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे. भारतातील या लसीचे वैज्ञानिक परीक्षण सकारात्मक आहे. भारतात डॉ. रेड्डीज यांच्या मदतीने हे परीक्षण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

देशातील कोरोना काळातील सर्वात वाईट महिना; एप्रिलमध्ये 66 लाख नव्या रुग्णांची भर

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

(Get vaccinated, Google Doodle urges people to take COVID-19 vaccine)