AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या मोबाईल वॉलेट युजर्ससाठी खुशखबर, RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने म्हटले आहे की, केवायसी आवश्यकता पूर्ण झाल्यास मोबाइल वॉलेट्स इंटरऑपरेबिलिटी सुलभ करू शकतात. (Good news for mobile wallet users, RBI changes money transfer rules)

Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या मोबाईल वॉलेट युजर्ससाठी खुशखबर, RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम
मोबाईल वॉलेट युजर्ससाठी खुशखबर, RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 07, 2021 | 6:14 PM
Share

नवी दिल्ली : लवकरच आपण एका मोबाइल वॉलेटमधून दुसर्‍या मोबाइल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यास सक्षम असाल. यासाठी, आपल्या मोबाइल वॉलेटचा सेवा प्रदाता कोण आहे याची आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. हे शक्य होणार आहे कारण आज भारतीय पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने विशेष घोषणा केली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने म्हटले आहे की, केवायसी आवश्यकता पूर्ण झाल्यास मोबाइल वॉलेट्स इंटरऑपरेबिलिटी सुलभ करू शकतात. (Good news for mobile wallet users, RBI changes money transfer rules)

सध्या अशा मोबाईल वॉलेट ऑपरेटर्सची संख्या खूप कमी आहे, जे एकमेकांच्या प्लॅटफॉर्मवर निधी हस्तांतरीत करण्यास अनुमती देतात. यामुळेच बऱ्याच वेळा आपल्याकडे आपल्या मोबाईल वॉलेटमध्ये पैसे असतात परंतु आपण ते दुसर्‍या कोणालाही ट्रान्सफर करू शकत नाही. तथापि, सेवा ऑपरेटर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. उदाहरणार्थ, आपण पेटीएम ते पेटीएफ किंवा फोनपे वर फोन पे दरम्यान पैसे हस्तांतरीत करू शकता.

आता दोन मोबाईल वॉलेटमध्ये पैसे कसे हस्तांतरीत करायचे?

तथापि सध्या मोबाइल वॉलेटमधून पैसे हस्तांतरीत करण्यासाठी युपीआयचा वापर देखील केला जातो. हे वॉलेट-टू-बँक, बँक-टू-वॉलेट किंवा बँक-टू-बँक हस्तांतरण म्हणून कार्य करते. परंतु, आरबीआयच्या नवीन घोषणेनंतर आपण कोणत्याही वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरीत करू शकता. उदाहरणार्थ समजले तर आपण पेटीएम मोबाइल वॉलेटमधून फोनपे वॉलेट वापरकर्त्याकडे पैसे हस्तांतरित करू शकता.

आऊटस्टँडिंग बॅलन्सची मर्यादा वाढली

प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्समधील मनी लॉन्ड्रिंगविरोधी नियमांचे पालन वाढवण्यासाठी आरबीआयने काही खास घोषणादेखील केल्या आहेत. केंद्रीय बँकेने केवायसीची आवश्यकता पूर्ण करणार्‍या खात्यांसाठी थकबाकीची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचे म्हटले आहे. आज आर्थिक धोरणाच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या काळात केंद्रीय बँकेकडून या संदर्भात संपूर्ण तपशीलवार मार्गदर्शक सूचना देण्यात येतील असेही ते म्हणाले. (Good news for mobile wallet users, RBI changes money transfer rules)

इतर बातम्या

पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख, नेमकी योजना काय?

Kisan Pension : शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहे ही योजना, दरमहा 55 रुपये भरा आणि मिळवा 3000 रुपये

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?