Iphone 13 आधीच Google Pixel 6 Series लाँच करणार, गुगलचा नवा प्लॅन, Apple ला टक्कर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 7:53 AM

गुगलने आपल्या पिक्सेल लाइनअपचा आधीच खुलासा केला आहे, कंपनी आता पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. गुगलने या स्मार्टफोनचे फीचर्स देखील उघड केले आहेत.

Iphone 13 आधीच Google Pixel 6 Series लाँच करणार, गुगलचा नवा प्लॅन, Apple ला टक्कर

मुंबई : गुगलने आपल्या पिक्सेल लाइनअपचा आधीच खुलासा केला आहे, कंपनी आता पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. गुगलने या स्मार्टफोनचे फीचर्स देखील उघड केले आहेत. पण कंपनीने अद्याप लॉन्चिंग डेटबद्दल माहिती दिलेली नाही. त्याच वेळी, काही सूत्रांकडून असे समजले आहे की, पिक्सेल 6 ची लॉन्च तारीख उघड झाली आहे. लीकनुसार, अॅपल आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी गुगल पिक्सेल 6 सिरीज बाजारात सादर केली जाईल. कंपनी 13 सप्टेंबरला हा फोन लाँच करू शकते. (Google Pixel 6 series smartphones reportedly launching on September 13)

गुगल पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो च्या लॉन्चची तारीख उघड करणाऱ्या टिपस्टर बाल्ड पांडाने वीबो वर याबाबतची माहिती उघड केली आहे. टिपस्टरने सांगितले आहे की, Apple इव्हेंट अर्थात आयफोन 13 लाँच करण्यापूर्वी, कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च करेल. जरी गुगलने अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केलेली नसली तर या फोनची किंमत आणि उपलब्धतेबाबतची माहिती लाँचिंग दरम्यानच कळेल.

गुगल पिक्सेल 6 सिरीजमध्ये कंपनी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल. मागच्या अहवालात सांगण्यात आले होते की, त्यात 33W चार्जिंग ब्रिक दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे आतापर्यंत पिक्सेल फक्त 18W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करत असे. गुगलबद्दल असेही सांगितले जात आहे की, कंपनी पिक्सेल 6 लाँच इव्हेंटमध्ये स्वतःचा फोल्डेबल फोन देखील सादर करु शकते.

संभाव्य फीचर्स

आधीच्या काही अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जातील. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज स्पेस पिक्सेल 6 प्रो मध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर, गुगलने असेही म्हटले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये इन-हाउस टेंसर चिपसेट दिला जाईल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्टॅक रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो बंपच्या आत ठेवला जाईल. त्याच वेळी, पिक्सेल 6 प्रो हा पिक्सेल 6 स्मार्टफोनपेक्षा मोठा असेल. जर कंपनी Apple iPhone 13 लाँच होण्याच्या एक दिवस आधी हा स्मार्टफोन लाँच करत असेल, तर नक्कीच काही मोठे नियोजन असणार हे स्पष्ट आहे. यावेळी कंपनी नक्कीच काहीतरी नवीन सादर करु शकते.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Google Pixel 6 series smartphones reportedly launching on September 13)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI