स्मार्टफोनची बॅटरी टिकवण्यासाठी गूगलच्या टिप्स

मुंबई : दिवसागणिक स्मार्टफोन युजर्सची संख्या वाढत आहे. जगात सुमारे 2.7 बिलीयन लोक स्मार्टफोनचा वापर करतात. पण स्मार्टफोन युजर्स बऱ्याचदा बॅटरी लो होण्याच्या समस्येला सामोरे जातात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतते. मात्र, यावर इंटरनेट जगतातील जायंट ‘गूगल’ने नामी उपाय सूचवला आहे.  स्मार्टफोन डार्क मोडवर ठेवल्यास स्मार्टफोन कमी […]

स्मार्टफोनची बॅटरी टिकवण्यासाठी गूगलच्या टिप्स
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : दिवसागणिक स्मार्टफोन युजर्सची संख्या वाढत आहे. जगात सुमारे 2.7 बिलीयन लोक स्मार्टफोनचा वापर करतात. पण स्मार्टफोन युजर्स बऱ्याचदा बॅटरी लो होण्याच्या समस्येला सामोरे जातात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतते. मात्र, यावर इंटरनेट जगतातील जायंट ‘गूगल’ने नामी उपाय सूचवला आहे. 

स्मार्टफोन डार्क मोडवर ठेवल्यास स्मार्टफोन कमी ऊर्जा खर्च करतो. परिणामी बॅटरीचे आयुष्य वाढतं आणि बॅटरी दीर्घ काळ टिकते. गूगलने संशोधनाअंती बॅटरीसंदर्भातील हा निष्कर्ष काढला आहे. मागील आठवड्यात गूगलकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गूगलने याबाबत माहिती दिली.

तसेच, बॅटरी कमी होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस आणि कलर हा आहे. यावर उपाय म्हणून, iOS ऑप्रेटिंग सिस्टीमचा वापर करणे होय. iOS ऑप्रेटिंग सिस्टीमच्या डार्क मोड सिस्टीममुळे स्क्रीनचा ब्लॅक कलर बदलला जाईल. त्यामुळे बॅटरी कमी ऊर्जा खर्च करेन.

संसोधनानुसार असं समोर आलं आहे की, 70  टक्क्याहून अधिक स्मार्टफोन युजर्स व्हाईट स्क्रीनचा वापर करतात. त्यामुळे अशा युजर्सच्या स्मार्टफोनची बॅटीर लवकर डेड होते. पण या डार्क मोड सिस्टीममुळे 43 टक्के अधिक काळ बॅटरी टिकेन.

एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी किती टिकते हे अनेकदा युजर्सच्या स्मार्टफोन वापरण्यावरही अवलंबून असतं. मात्र, अनेकदा संबंधित कंपनीच्या बॅटरीच्या गुणवत्तेवरही अवलंबून असतं. मात्र, गूगलने सूचवलेले उपयाही मर्यादित क्षेत्रात महत्त्वाचे आहेत, असे स्मार्टफोन बाजारात म्हटले जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें