व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग प्लॅटफॉर्म असलेले Google Vids आता सर्वांसाठी मोफत, असे करा ट्राय
गुगलने आता त्यांचे व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग प्लॅटफॉर्म गुगल व्हिड्स हे सर्व वर्कस्पेस वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. याआधी हे गुगल व्हिड्स शुल्क भरलेल्या वर्कस्पेस वापरकर्त्यांपुरते मर्यादित होते, परंतु आता मोफत व्हर्जनमध्ये देखील बेसिक टुल्स दिली जात आहेत. चला तर मग आजच्या लेखात गुगल व्हिड्स कसे वापरायचे ते जाणून घेऊयात.

गुगल कंपनीचा नवीन व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग प्लॅटफॉर्म असलेला गुगल व्हिड्स आता सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये शुल्क भरल्यानंतर वर्कस्पेस वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले होते. आता माउंटन व्ह्यू-आधारित टेक जायंटने काही दिवसांपूर्वी वर्कस्पेसच्या फ्रि टिअरवर असलेल्यांसाठी त्याचे बेसिक नॉन-एआय व्हर्जन देखील ऑफर केले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना सर्व एडिटिंग आणि डेक टुल्समध्ये प्रवेश मिळेल, परंतु त्यांना व्हेओ 3 व्हिडिओ जनरेशन मॉडेल, स्टोरीबोर्ड फिचर्स किंवा एआय व्हॉइसओव्हर टूलमध्ये प्रवेश मिळणार नाही. चला तर मग गुगलचे हे प्लॅटफॉर्म कसे वापरायचे ते जाणून घेऊयात.
एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने सर्व वापरकर्त्यांसाठी व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग टूल्स हे काही मर्यादांसह विस्तारित करण्याची घोषणा केली. कंपनीने असेही सांगितले आहे की Google Vids चे आता एक मिलियन ॲक्टिव्ह मंथली वापरकर्ते आहेत.
वापरकर्त्यांना ज्या टुल्समध्ये प्रवेश असेल त्यात अँकर-लेड व्हिडिओ आणि स्क्रीन रेकॉर्डिंग, गुगल ड्राइव्ह, फोटो आणि डिव्हाइसमध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ अपलोड करणे तसेच स्लाइड्स इम्म्पोर्ट करणे आणि व्हिडिओ टेम्पलेट्सच्या रेंजमधून निवडणे अशा टूल्सचा वापर करता येणार आहे. मात्र 2018 मध्ये सादर केलेल्या व्हेओ 3 द्वारे व्हिडिओ एडिटिंग फिचर्सचा वापर करता येणार नाही. तर वापरकर्त्यांना फक्त आठ सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ एडिटिंग करता येईल.
Google Vids मोफत कसे वापरायचे?
सर्वप्रथम तुम्हाला Google Vids प्लॅटफॉर्मला भेट द्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये ‘https://workspace.google.com/intl/en_in/products/vids/’ ही URL ओपन करा.
तिथे पोहोचल्यावर तुमच्या Google खात्याने लॉग इन करा.
पुढे तुम्हाला Google Slides सारख्या इंटरफेसवर रिडायरेक्ट केले जाईल.
येथे उजव्या बाजूला तुम्हाला एक रेकॉर्ड बटण दिसेल, जे तुम्हाला स्वतःला किंवा तुमची स्क्रीन रेकॉर्ड करण्याची परवानगी देते.
पुढे Script पर्याय तुम्हाला एखाद्या तुमच्या आवडत्या दृष्यासाठी स्क्रिप्ट अपलोड करू देण्यासाठी किंवा दिलेल्या स्पेसमध्ये लिहिण्याची परवाणगी देते.
upload पर्याय वापरकर्त्यांना त्यांच्या ड्राइव्ह, फोटो किंवा डिव्हाइसमधून अनेक मीडिया फाइल्स निवडण्याची आणि जोडण्याची परवानगी देतो.
पुढे stock पर्याय वापरकर्त्यांना क्युरेट केलेल्या यादीतून स्टॉक प्रतिमा आणि व्हिडिओ निवडण्याची परवानगी देतो.
text आणि shapes हे बेसिक टुल्स आहेत जी तुम्हाला स्लाईडमध्ये ऐलिमेंट्स जोडण्याची परवानगी देतात.
शेवटी, टेम्पलेट्स तुम्हाला व्हिडिओ डिझाइन निवडण्याचा आणि त्यावर बिल्ड करण्याचा पर्याय देतात
