AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओ वापरकर्त्यांसाठी उत्तम ऑफर, ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन

MyJio अॅप, Jio वेबसाइट किंवा कोणत्याही पेमेंट अॅपवरून या प्लॅनद्वारे रिचार्ज केल्यानंतर तुमचे नेटफ्लिक्स खाते लिंक करा आणि तुमच्या आवडत्या कंटेंटचा त्वरित आनंद घेण्यास सुरुवात करा. चला या जबरदस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊयात...

जिओ वापरकर्त्यांसाठी उत्तम ऑफर, 'या' प्लॅनमध्ये मिळणार मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन
jio-netflix
| Edited By: | Updated on: Aug 11, 2025 | 11:04 PM
Share

तुम्हाला जर तुमचे आवडते शो आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर अतिरिक्त पैसे न देता पहायचे असतील, तर रिलायन्स जिओ तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आला आहे. काही खास जिओ प्रीपेड प्लॅनसह, तुम्हाला आता मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ना कोणतेही वेगळे रिचार्ज फक्त रिचार्ज करा आणि लगेच स्ट्रीमिंग सुरू करा. चला तर या धमाकेदार प्लॅनबद्दल जाणून घेऊयात…

एकाच प्लॅनमध्ये मोबाईल आणि नेटफ्लिक्स

सहसा नेटफ्लिक्सचा मासिक प्लॅन शंभर रुपयांपासून सुरू होतो, परंतु जिओच्या या खास रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला मोबाईल रिचार्ज आणि नेटफ्लिक्स दोन्हीचा एकत्रित फायदा मिळेल. यासोबतच तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच मनोरंजन आणि डेटा स्टोरेज दोन्हीचा ताण एकाच रिचार्जमध्ये कमी होणार आहे. जिओच्या 1,299 व 1,799 रूपयांच्या या धमाकेदार प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा फायदा घेता येणार आहे.

1,299 रूपयांचा प्लॅन

  • वैधता: 84 दिवस
  • डेटा: दररोज 2 जीबी (एकूण 168 जीबी)
  • इतर फायदे: अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस.
  • बोनस: नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड अॅक्सेस

हा प्लॅन अशा लोकांसाठी परिपूर्ण आहे जे दररोज स्ट्रीमिंग करतात परंतु त्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही.

1,799 रूपयांचा प्लॅन

  • वैधता: 84 दिवस
  • डेटा: दररोज 3 जीबी (एकूण 252जीबी)
  • इतर फायदे: अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस.
  • बोनस: नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड अॅक्सेस

जर तुम्ही खूप व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग किंवा मोठ्या फाइल्स डाउनलोड करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे.

ऑफर कशी मिळवायची?

MyJio अॅप, Jio वेबसाइट किंवा कोणत्याही पेमेंट ॲपवरून 1,299 किंवा 1,799 रुपयांचे रिचार्ज करा. रिचार्ज सक्रिय झाल्यानंतर, तुमचे Netflix खाते लिंक करा किंवा एक नवीन तयार करा आणि तुमच्या आवडत्या कंटेंटचा त्वरित आनंद घ्या. काही इतर Jio प्लॅनमध्ये JioHotstar आणि Amazon Prime सारखे सबस्क्रिप्शन देखील येतात.

एअरटेलच्या प्लॅनमध्येही ओटीटी फायदे

181 रुपयांचा प्लॅन: 30 दिवसांची वैधता, 15 जीबी डेटा आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले मेंबरशिपसह Sony Liv, Hoichoi, Lionsgate Play, Sun NXT, Chaupal यासह 22+ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश करता येणार आहे.

451 रुपयांचा प्लॅन: 30 दिवसांची वैधता, 50 जीबी डेटा आणि जिओ सिनेमा (हॉटस्टार) चे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यामुळे तुम्ही क्रिकेट, बॉलिवूड आणि वेब सिरीज पाहू शकता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.