AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसतानाही आधार कसं डाऊनलोड कराल?

तुम्ही आता तुमचे नातेवाईक किंवा मित्र त्यांच्यासाठीही तुम्ही आधार रीप्रिंट सर्व्हिस करु शकता. यानंतर त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाईल.

मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसतानाही आधार कसं डाऊनलोड कराल?
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
| Edited By: | Updated on: Jun 06, 2019 | 11:35 PM
Share

मुंबई : आतापर्यंत आधार कार्डला रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपीच्या मदतीने प्रिंट केले जात होते. पण आता तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरशिवायही आधार कार्ड प्रिंट करता येणार आहे. नुकतंच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था म्हणजेच UIDAI ने नागरिकांना ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ सर्व्हिसची माहिती दिलेली आहे. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत जोडलेला असो किंवा नंबर बदलेला असो, तरीही तुम्ही पुन्हा आधार कार्ड प्रिंट करु शकता.

याशिवाय तुम्ही आता तुमचे नातेवाईक किंवा मित्र त्यांच्यासाठीही तुम्ही आधार रीप्रिंट सर्व्हिस करु शकता. यानंतर त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाईल.

पाहा पूर्ण प्रक्रिया

  • सर्वात पहिले www.uidai.gov.in  किंवा resident.uidai.gov.in च्या वेबसाईट वर जा.
  • या ठिकाणी Order Aadhaar Reprint ऑप्शनवर क्लिक करा
  • यानंतर तुमचा 12 चा आधार कार्ड नंबर किंवा 16 डिजीटचा व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर टाका
  • यानंतर सिक्युरिटी कोड भरा.
  • जर तुमच्याकडे रजिस्टर नंबर नसेल, तर त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि येथे कोणता दुसरा नंबर असेल तो टाका.
  • यानंतर आता Send OTP वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन प्रोसेस करा.
  • तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्डचे एकदा फायनल प्रिव्ह्यूही पाहू शकता.
  • प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन आधार रीप्रिंटचे शुल्क भरा.
  • पेमेंट केल्यानंतर रिसीट जनरेट होईल, त्यामुळे तुम्ही पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करु शकता. त्यासोबतच तुम्हाला SMS च्या माध्यमातून सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल.
  • यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला तुमचे आधारकार्ड मिळेल, तुम्ही तुमच्या आधार कार्डची डिलीव्हरीही ट्रॅक करु शकता.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.