अॅक्टिव्हाला टक्कर हिरोची नवी स्कूटी लाँच

अॅक्टिव्हाला टक्कर हिरोची नवी स्कूटी लाँच

मुंबई : हिरो मोटोकॉर्पने भारतात Maestro Edge 125 स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे तीन व्हेरिअंट आहेत. एकामध्ये डिस्क ब्रेक,तर दसुऱ्यामध्ये ड्रम ब्रेक आहे. किंमत पाहिली तर ड्रम व्हेरिअंटची सुरुवात 58 हजार 500 रुपये आहे. डिस्क ब्रेकच्या व्हेरिअंटची किंमत 60 हजार रुपये आहे. तिसऱ्या व्हेरिअंटची किंमत 62 हजार 700 रुपये आहे, हा FI व्हर्जन आहे . या सर्व किंमती दिल्लीतील एक्स शोरुमच्या आहेत.

Maestro Edge 125 स्कूटरची विक्री 16 मे पासून सुरु होणार आहे. कंपनीने गेल्यावर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान ही स्कूटर प्रदर्शित केली होती. ही स्कूटर चार रंगात उपलब्ध आहे. यामध्ये ब्लू, ब्राऊन, ग्रे आणि रेड रंगाचा समावेश आहे. या स्कूटरमध्ये 12 इंचाचा फ्रंट एलॉय आहे, तर 10 इंचाचा रिअर एलॉय दिला आहे.

Hero Maestro Edge 125 चा FI व्हर्जन पँथर ब्लॅक आणि फेडलेस व्हाईट रंगात उपलब्ध आहे. Maestro Edge मध्ये 110cc स्कूटरच्या तुलनेत फारसे बदल केले नाहीत. Maestro Edge 125 मध्ये तुम्हाला 125cc सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन मिळते. यामध्ये सीव्हीटी दिला आहे, त्यामुळे गिअर बदलताना सोपे पडते.

Hero Maestro Edge 125 मध्ये दिलेले खास फीचर पाहिले तर, यामध्ये यूएसबी चार्जिंग पर्याय दिला आहे. इंस्ट्रूमेंट कंसोल अनलॉग आणि डिजिटल आहे. यामध्ये i3S स्टार्ट स्टॉप सिस्टम दिला आहे. यामुळे पेट्रोलची बचत होते.

या नव्या स्कूटरमध्ये साईड स्टँड इंडिकेटरही दिला आहे आणि सर्व्हिस रिमाइंडर सारखे गरजेचे फीचर दिले आहेत. याशिवाय कंपनीने एक्सटर्नल फ्यूल कॅपही दिला आहे. सस्पेंशनसाठी यामध्ये टेलीस्कोपिक फोर्क्स दिला आहे. ब्रेकिंगसाठी यामध्ये रेग्यूलेटरनुसार इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI