Honor चा १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

गेल्या काही दिवसांपासून Honor च्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर हा फोन लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेण्यात या फोनचे फीचर्स , किंमत आणि वैशिष्ट्ये.

Honor चा १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Honor X9C Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:32 PM

स्मार्टफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे Honor कंपनीने त्यांचा Honor X9C हा नवा स्मार्टफोन लाँच केला असून हा स्मार्टफोन त्यांनी मलेशियात लाँच केला आहे. Honor X9C या स्मार्टफोन मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम, स्नॅपड्रॅगन ६ जेन १ प्रोसेसर आणि आयपी ६५ एम रेटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन Honor X9C मध्ये ६६०० mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून ६६ वॉट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करणारा आहे. तसेच हा नवा फोन फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच झालेल्या ऑनर एक्स ९ बी चा अपग्रेड व्हेरियंट आहे.

Honor X9C या स्मार्टफोनची किंमत

मलेशियात Honor X9C च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटची किंमत १,४९९ एमवायआर (भारतीय चालनानुसार सुमारे २८,७०० रुपये) आहे. तर १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १,६९९ एमवायआर (सुमारे ३२,५००रुपये) आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लिस्ट करण्यात आला आहे, परंतु त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा फोन जेड सायन, टायटॅनियम ब्लॅक आणि टायटॅनियम पर्पल कलरमध्ये उपलब्ध केला आहे. हे डिव्हाइस सिंगापूरमध्ये ऑनलाइन रिटेल स्टोअरद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

Honor X9C या स्मार्टफोनचे फीचर्स

Honor X9C या नव्या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा १.५ के (1,224× 2,700 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनची स्क्रीन ४००० निट्स टिपिकल ब्राइटनेसला सपोर्ट करत असून आय प्रोटेक्शन फीचर यात आहे.

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६ जेन १ प्रोसेसर आणि अॅड्रेनो A ७१० जीपीयू देण्यात आला आहे. तर हँडसेटमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ बेस्ड मॅजिकओएस ८.० वर प्रोसेस करतो.

तर या स्मार्टफोन मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.१,ओटीजी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. हँडसेटचा आकार १६२.८ बाय ७५.५ बाय ७.९८ मिमी असून वजन १८९ ग्रॅम आहे.

Honor X9C मध्ये फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेन्सर दिला असून जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (ओआयएस) सोबत येतो. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.