AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा फोन हरवला? मग आता एकाच पोर्टलवरुन करा फोन आणि सिम ब्लॉक, स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस कशी?

तुम्हाचे सिम कार्ड हरवले किंवा चोरीला गेले आहे का? बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी Jio, Airtel, Vi आणि BSNL चे सिम कार्ड ऑनलाइन, ॲप किंवा कॉलद्वारे त्वरित कसे ब्लॉक करावे आणि नवीन सिम कसे मिळवावे, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

तुमचा फोन हरवला? मग आता एकाच पोर्टलवरुन करा फोन आणि सिम ब्लॉक, स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस कशी?
block lost SIM card
| Updated on: Jun 12, 2026 | 1:05 PM
Share

फोन चोरीला जाणे किंवा सिम कार्ड हरवणे ही केवळ एक साधी समस्या नसून यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. आजच्या डिजीटल युगात तुमचे सिम कार्ड केवळ फोन कॉलसाठी मर्यादित राहिलेले नाही. ते तुमच्या बँक खात्याशी, आधार कार्डशी, UPI पेमेंट ॲप्स जसे की PhonePe, Google Pay आणि इतर महत्त्वाच्या सेवांशी जोडलेले असते. तसेच हल्ली बहुतांश ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी आवश्यक असणारा OTP याच नंबरवर येतो. त्यामुळे जर हे सिम कार्ड चुकीच्या हातात पडले, तर त्याचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

तुमच्याकडे Jio, Airtel, Vi (Vodafone Idea) किंवा BSNL यांपैकी कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड असो, ते हरवल्यास त्वरित ब्लॉक करणे आणि नवीन सिम मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काही सोप्या टीप्स वापरुन तुम्ही ते ब्लॉक करु शकता.

कस्टमर केअरला कॉल करून सिम ब्लॉक करा

सिम कार्ड हरवल्याचे समजताच दुसऱ्या कोणत्याही फोनवरून खालील कस्टमर केअर नंबरवर कॉल करा. प्रतिनिधीला तुमच्या सिम कार्डची मालकी पटवून देण्यासाठी काही वैयक्तिक माहिती (जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता आणि शेवटचे रिचार्ज) द्यावी लागेल.

  • Jio ग्राहक: 1800-889-9999 वर कॉल करा.
  • Airtel ग्राहक: १२१ (Airtel नंबरवरून) किंवा 1800-103-4444 वर कॉल करा.
  • Vi ग्राहक: १९९ (Vi नंबरवरून) किंवा 9820098200 वर कॉल करा.
  • BSNL ग्राहक: १५०३ (1503) किंवा 1800-180-1503 वर कॉल करा.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपचा वापर करा

सर्वच प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वेबसाइट आणि अधिकृत ॲप्सवर ‘लॉस्ट सिम’ (Lost SIM) किंवा सिम ब्लॉक करण्याची सुविधा देतात. यासाठी संबंधित कंपनीच्या (MyJio, Airtel Thanks, Vi App) अधिकृत ॲप किंवा वेबसाइटला भेट द्या. तिथे ‘Support’ किंवा ‘Help & Support’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Block SIM’ किंवा ‘Lost SIM’ चा पर्याय निवडा. तुमचा हरवलेला नंबर टाकून पर्यायी नंबरवर येणाऱ्या OTP द्वारे किंवा पडताळणीच्या इतर पायऱ्या पूर्ण करून सिम निलंबित (Suspend) करा.

‘संचार साथी’ (Sanchar Saathi) पोर्टलचा वापर करा  

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने ‘Sanchar Saathi’ (sancharsaathi.gov.in) हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवरील CEIR (Central Equipment Identity Register) या सेवेच्या मदतीने तुम्ही देशातील कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड आणि चोरीला गेलेला फोन दोन्ही एकाच ठिकाणाहून ब्लॉक करू शकता. यामुळे तुमचा फोन संपूर्ण देशात कुठेही वापरता येणार नाही.

हरवलेले सिम कार्ड बदलून कसे मिळवायचे?

सिम कार्ड यशस्वीरित्या ब्लॉक केल्यानंतर, तुम्ही ते जवळच्या संबंधित टेलिकॉम ऑपरेटरच्या स्टोअरमध्ये (उदा. Jio Store, Airtel Store, Vi Store) जाऊन बदलून (Replace) घेऊ शकता. सिम बदलण्यासाठी तुमच्याकडे मूळ ओळखीचा वैध पुरावा (POI) असणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या नावावर सिम असेल, तर तुम्हाला स्वतः तिथे जावे लागेल. सिम बदलण्यासाठी कंपन्यांनुसार ₹२५ ते ₹५० पर्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते. सिम बदलून घेताना तुमच्या त्या नंबरवर एक सक्रिय (Active) रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.

ट्राय (TRAI) च्या सुरक्षा नियमांनुसार, नवीन सिम कार्ड सुरू झाल्यानंतर पहिल्या २४ या २४ तासांसाठी एसएमएस (SMS) सेवा पूर्णपणे बंद असते. म्हणजेच २४ तासांनंतरच तुम्हाला बँकेचे ओटीपी (OTP) किंवा सामान्य मेसेज येणे सुरू होईल. त्यामुळे जर तुमचा फोन किंवा सिम हरवल्यास अजिबात वेळ न घालवता वरील पद्धतींचा वापर करून आधी सिम सुरक्षित करा, जेणेकरून कोणत्याही संभाव्य सायबर गुन्ह्यापासून किंवा फसवणुकीपासून तुमचा बचाव होईल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!