AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या फोनवर येणारे SMS खरे की खोटे? TRAI ने सांगितलेल्या पद्धतीने असं करा चेक

तुमच्या फोनवर दिवसभरात अनेक SMS येत असतील. मात्र तुम्ही खरे आणि बनावट SMS ओळखू शकलात तर तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

तुमच्या फोनवर येणारे SMS खरे की खोटे? TRAI ने सांगितलेल्या पद्धतीने असं करा चेक
SMS
| Updated on: Aug 28, 2025 | 6:05 PM
Share

तुमच्या फोनवर दिवसभरात अनेक SMS येत असतील. यातील काही एसएमएस हे खरे असतात तर काही हे बनावट असतात. बनावट मेसेजमुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याचा धोका असतो. अशा मेसेजमध्ये फसवणूक करणाऱ्या लिंक असतात. यावर क्लिक केल्यास सायबर चोर तुमच्या बँक खात्याची माहिती चोरतात आणि तुमची खाती रिकामी करतात. मात्र तुम्ही खरे आणि बनावट SMS ओळखू शकलात तर तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता. हे SMS खरे की खोटे हे कसं ओळखायचं याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बनावट SMS आणि कॉल्सबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. यामुळे फोनवर येणारे बरेच बनावट कॉल नेटवर्क पातळीवरच ब्लॉक केले जातात. मात्र एसएमएस मात्र तुमच्या इनबॉक्समध्ये प्रवेश करतात. बनावट एसएमएस ओळखणे देखील सोप्पं आहे. बऱ्याचदा तुम्हाला बँका, ई-कॉमर्स कंपन्या, टेलिकॉम ऑपरेटर, सरकारी संस्था याच्याकडून प्रमोशनल मेसेज पाठवले जातात. मात्र सायबर चोर असेच मेसेज तयार करून लोकांना पाठवतात आणि त्यांची फसवणूक करतात.

सायबर चोर खोट्या एसएमएसद्वारे व्हायरस असलेल्या अ‍ॅप्सच्या लिंक्स लोकांना पाठवतात. यावर क्लिक केल्यास व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो आणि तुमची माहिती चोरतो. याद्वारे चोर तुमची फसवणूक कर शकतो. त्यामुळे बनावट मेसेजपासून सावध राहणे गरजेचे आहे.

SMS खरा की खोटा हे कसं ओळखायचं?

मोबाईलवर येणारे SMS खरे की खोटे हे तपासण्यासाठी तुम्हाला काही पडताळणी करण्यासाठी तुम्हाला काही कोड लक्षात ठेवावे लागतील. तुमच्या फोनवर येणाऱ्या मेसेजच्या टायटलच्या शेवटी, ‘-‘ नंतर, S, G किंवा P लिहिलेले असेल तर ते असे मेसेज खरे असतात. त्याचबरोबर या मेसेजमध्ये दिलेली माहितीही खरी असते. मात्र इतर नंबरवरून येणारे SMS खोटे असू शकतात.

या कोडचा अर्थ काय असतो?

  • S – बँकिंग, किंवा दूरसंचार सेवांच्या संबंधित मेसेजच्या शेवटी S लिहिलेले असते. याचा अर्थ असा की हा मेसेज तुम्हाला मिळणाऱ्या सर्व्हिसशी संबंधित आहे.
  • G – सरकारी योजना, सरकारने पाठवलेले अलर्ट याबाबतच्या मेसेजच्या शेवटी तुम्हाला G असे दिसेल. G चा अर्थ सरकार (Government) असा आहे.
  • P – व्हाइटलिस्ट कंपन्यांच्या प्रमोशनल मेसेजच्या टायटलच्या शेवटी तुम्हाला P दिसेल. या कंपन्यांना दूरसंचार विभागाने मान्यता दिलेली असते.

दरम्यान, तुम्हाला येणाऱ्या मेसेच्या टायटलच्या शेवटी S,G,P व्यतिरिक्त काही असेल किंवा काहीही नसेल तर ते मेसेज बनावट असण्याची शक्यता आहे. अशा SMS पासून दूर राहणे फायद्याचे ठरेल.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.