AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram तुमच्या कंट्रोलमध्ये हवं? प्रायव्हसीसाठी ‘या’ 5 ट्रिक्स वापरा

Make your Instagram account private: आजकाल Instagram सह सर्वच सोशल मीडियावर आपल्याशी कनेक्टेड लोक असतात. त्यामुळे आपली Instagram स्टोरी, पोस्ट काही विशिष्ट लोकांनी पाहू नये, असं आपल्याला वाटत असतं. पण तरीही त्या लोकांना Instagram स्टोरी किंवा पोस्ट दिसतेच. यामुळे आपली गोपनीयता म्हणजेच प्रायव्हसी धोक्यात येते. आज आम्ही तुम्हाला Instagram अकाऊंटवर जास्तीत जास्त प्रायव्हसी ठेवण्यासाठी काय करायला हवं, यासाठी 5 ट्रिक्स सांगणार आहोत. याविषयी जाणून घ्या.

Instagram तुमच्या कंट्रोलमध्ये हवं? प्रायव्हसीसाठी ‘या’ 5 ट्रिक्स वापरा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 6:15 PM
Share

Instagram वर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शेअर करतो. सुट्ट्यांमध्ये घालवलेले क्षण असोत, मित्रांसोबतच्या पार्ट्या असोत किंवा कोणताही खास क्षण असो, आपण Instagram वर सर्वकाही अपलोड करतो. परंतु, या ओपन प्लॅटफॉर्मवर आपली प्रायव्हसी म्हणजेच गोपनीयता जपणंही खूप गरजेचं आहे.

कधी कधी प्रत्येकाने आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पाहाव्या, असे आपल्याला वाटत नाही. अशावेळी Instagram आपल्याला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने आपण आपलं Instagram अकाऊंट अधिक प्रायव्हेट करू शकतो. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

सोशल मीडियावरील सुरक्षा ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. Instagram वर आपली प्रायव्हसी राखणे अधिकच महत्त्वाचे झाले आहे. अनोळखी लोकांनी आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पहाव्या, असे आपल्याला वाटत नसल्यास आपले Instagram अकाऊंट प्रायव्हेट करण्याचे काही सोपे पर्याय आहेत. तुम्ही तुमचे Instagram अकाऊंट अधिक खासगी कसे बनवू शकता. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

जवळच्या मित्रांची यादी तयार करा

आपल्या सर्व मित्रांनी आपल्या Instagram पोस्ट आणि स्टोरी पहाव्या, असे आपल्याला वाटत नसल्यास, जवळच्या मित्रांची यादी तयार करा. या यादीमध्ये तुम्ही अशा लोकांना जोडू शकता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करू इच्छिता.

यासाठी Instagram मधील सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ Close friends ‘वर टॅप करा. इथे तुम्ही अशा मित्रांची नावे निवडू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला Instagram पोस्ट किंवा स्टोरी शेअर करायची आहे.

Instagram स्टोरी लपवा

आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आपली Instagram स्टोरी आणि लाईव्ह व्हिडिओ दाखवू इच्छित नसाल तर आपण ते लपवू शकता. यासाठी तुमच्या Instagram सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ Who can see your content ‘ सेक्शनमध्ये जाऊन ‘ Hide story and live’ या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला लोकांना यादीत समाविष्ट करण्याचा पर्याय मिळतो.

अ‍ॅक्टिव्हिटी लपवा

व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच Instagram वरही तुम्ही शेवटचे ऑनलाईन कधी होतात, हे दिसतं. आपण ते लपवू इच्छित असल्यास सेटिंग्जमधील मॅसेज आणि स्टोरी फिडबॅक सेक्शनमध्ये अ‍ॅक्टिव्हिटी बंद करा.

Read Receipts बंद करा

Instagram वर तुमचे मेसेज कधी वाचले गेले हेही तुम्ही पाहू शकता. आपण त्यांचा मॅसेज वाचला आहे हे लोकांना कळू नये, असे आपल्याला वाटत असल्यास, सेटिंग्जमधील ‘Messages and story replies’ सेक्शनमधील ‘Show read receipts’ याला डिसेबल करा.

विशिष्ट लोकांशी संवाद मर्यादित करा

कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्यांच्याशी संवाद मर्यादित करू शकता. असे केल्याने ती व्यक्ती तुम्हाला मेसेज, कमेंट आणि रिप्लाय देऊ शकणार नाही. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ How others can interact with you ‘ या विभागातील ‘ Limit interactions ‘ हा पर्याय निवडा. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे Instagram अकाऊंट अधिक प्रायव्हेट बनवू शकता आणि आपली प्रायव्हसी मजबूत करू शकता.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत