AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्चा सिस्टम कसं काम करतं? सविस्तर समजावून घ्या

आजकाल इंटरनेटवर वेबसाइट्स ब्राउज करताना आपण अनेकदा एक छोटं चेकबॉक्स पाहतो 'I’m Not a Robot'. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं, की फक्त एका क्लिकमधून कसं काय सिद्ध होतं की आपण रोबोट नाही? मग चला, जाणून घेऊया की हे कसं समजतं.

कॅप्चा सिस्टम कसं काम करतं? सविस्तर समजावून घ्या
| Edited By: | Updated on: Jul 29, 2025 | 4:13 PM
Share

आजच्या डिजिटल युगात, आपण अनेकदा वेबसाइट्सवर सर्फ करताना “I’m Not a Robot” असं एक छोटंसं चेकबॉक्स पाहतो. पाहायला अगदी साधं वाटणारं हे चेकबॉक्स, खरंतर एका जबरदस्त आणि गुंतागुंतीच्या सुरक्षा यंत्रणेचं प्रवेशद्वार असतं. हे यंत्रणा केवळ तुमच्या एका क्लिकवर विश्वास ठेवत नाही, तर तुमचं पूर्ण वर्तन बारकाईने पाहत असते. मग हे नेमकं काम कसं करतं आणि ते कशासाठी आहे, हे जाणून घेऊया.

काय असतं हे “I’m Not a Robot” चेकबॉक्स?

हे चेकबॉक्स म्हणजे CAPTCHA (Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart) नावाच्या यंत्रणेचा भाग आहे. हे यंत्रणा बॉट्स (automated programs) आणि खर्‍या वापरकर्त्यांमधील फरक ओळखण्यासाठी वापरली जाते. वेबसाईट्सना स्पॅम, फसवणूक, डेटा चोरणं अशा धोक्यांपासून वाचवण्यासाठी CAPTCHA एक महत्त्वाचा डिजिटल दरबारी (Gatekeeper) आहे.

क्लिक करताच काय काय तपासलं जातं?

तुम्ही “I’m Not a Robot” वर क्लिक करता, तेव्हा वाटतं की आपण फक्त एक बटन दाबलं, पण खरंतर तसं नसतं! हे यंत्रणा फक्त तुमच्या क्लिकवर नाही, तर त्या आधी आणि नंतर तुम्ही काय केलं, त्यावरही बारकाईनं लक्ष ठेवते. जसं की….

1. माउस हलवण्याची पद्धत: माणूस जेव्हा माउस हलवतो, तेव्हा थोडं इकडं-तिकडं, थांबून किंवा वाकडं तिकडं हलवतो. पण जर बॉट (संगणक प्रोग्रॅम) असेल, तर माउस अगदी सरळ रेषेत, नीटनेटका आणि वेगाने हलवतो. त्यावरून लक्षात येतं की समोर माणूस आहे की मशीन.

2. क्लिक करताना घेतलेला वेळ: तुम्ही क्लिक करण्याआधी किती वेळ घेतलात? स्क्रोल करताना किती वेळ लावलात? हे सगळं पाहून यंत्रणा अंदाज लावते की तुम्ही खरोखर एखादं पेज वाचत होतात की फक्त स्क्रिप्ट वापरून अ‍ॅक्सेस घेतला जातोय.

3. तुमचं डिव्हाइस आणि ब्राउजरची माहिती: तुम्ही कोणत्या ब्राउजरमधून आलेत, तुमचं IP अ‍ॅड्रेस काय आहे, स्क्रीनचं साईझ काय आहे, तुम्ही कोणत्या टाइम झोनमध्ये आहात, तुमच्याकडे कोणते प्लगइन्स आहेत ही सगळी माहिती एकत्र केली जाते.

गूगल खातं आणि यंत्रणांची सुसंवाद

जर तुम्ही Google खात्यात लॉग इन असाल, तर reCAPTCHA तुम्ही अलीकडे काय ब्राउझ केलं, हे पाहूनही तुमचं मानवी अस्तित्व ओळखू शकतं. बऱ्याच वेळा यामुळे तुम्हाला चॅलेंज न मिळताच थेट अ‍ॅक्सेस मिळतो.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.