अमेरिका-चीनच्या साम्राज्याला भारताचा पहिला हादरा; या क्षेत्रात मेड इन इंडियाचा शिक्का, ट्रम्प यांचा नुसता थयथयाट
Made in Indica Chip : सेमीकंडक्टर चिप ही आज प्रत्येक अत्याधुनिक यंत्राचे हृदय म्हटले तर वावगे ठरणार नाही. चिप इकोसिस्टिम ताब्यात घेण्यासाठी चीन आणि अमेरिकेत चढाओढ असतानाच आता भारताने दोन्ही महासत्तांना खरा दणका दिला. काय आहे ती अपडेट?
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तयार झालेली पहिली चिप भेट दिली. वैष्णव यांनी विक्रम 32-बिट प्रोसेसर आणि इतर मंजूर प्रकल्पातील टेस्ट चिप पण सादर केल्या. सेमीकंडक्टर ही आजच्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य, दळणवळण, संवाद, संरक्षण आणि अंतराळ विज्ञानात या चिपचा सर्वाधिक वापर होतो. इतकेच नाही तर ऑटो क्षेत्रातही सेमीकंडक्टर, चिपला महत्त्व प्राप्त झाले आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान चिप इकोसिस्टिमवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिजिटल आणि ऑटोमेशन जसे झपाट्याने वाढत आहे. तशी सेमीकंडक्टर आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी आवश्यक ठरत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याची शक्यता आहे.
भारत अत्यंत वेगाने या दिशेने जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत सेमीकॉन इंडिया 2025 चे उद्धघाटन केले. 2021 मध्ये 10 सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्ससाठी सरकारने अगोदरच परवानगी दिली आहे. त्यासाठी 18 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने चिप तयार करण्यास सुरुवात झाली. सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्यात आले. अवघ्या 3.5 वर्षात जगाचा भारतावरील विश्वास दिसून आला. आज देशात पाच सेमीकंडक्टर युनिट्सची निर्मिती अत्यंत वेगाने सुरू आहे. आता पंतप्रधान मोदी यांना पहिली मेड इन इंडिया चिप भेट देण्यात आल्याचे मंत्री वैष्णव यांनी माहिती दिली.
First ‘Made in India’ Chips! A moment of pride for any nation. Today, Bharat has achieved it. 🇮🇳
This significant milestone was made possible by our Hon’ble PM @narendramodi Ji’s far-sighted vision, strong will and decisive action. pic.twitter.com/ao2YeoAkCv
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 2, 2025
भारताची मोठी मुसंडी
इस्त्रोच्या सेमीकंडक्टर लॅबने विक्रम प्रोसेसर तयार केले आहे. हा भारताचा पहिला स्वदेशी 32-बिट मायक्रोप्रोसेसर आहे. हा लाँचिंगदरम्यान अडचणीतही काम करू शकतो. 2021 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू झाले. चार वर्षात भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठा बदल झाला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने 76,000 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह योजनेची घोषणा करण्यात आली. यामध्ये जवळपास 65 हजार कोटी रुपये अगोदरच देण्यात आले आहेत. 28 ऑगस्ट रोजी गुजरातमधील साणंद येथे देशातील पहिली एंड टू एंड आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेम्बल अँड टेस्ट (OSAT) पायलट लाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. CG-Semi या सेमीकंडक्टर कंपनीने पहिली मेड इन इंडिया चिप तयार करून दिली आहे.
