42 हजारांना तयार होणारा iPhone 1.32 लाखांना का विकला जातो? ‘हे’ आहे कारण
गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 16 सिरीजमधील सर्वात महागडे मॉडेल आयफोन 16 प्रो मॅक्स हा कंपनीचा सर्वात महागडा फोन आहे. याचा उत्पादन खर्च कमी आहे मात्र त्याची किंमत का जास्त आहे ते जाणून घेऊयात.

Apple ही जगातील सर्वात महागडा फोन बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. अॅपलचा सर्वात महागडा आयफोन लाखो रुपयांना विकला जातो. मात्र हा फोन तयार करण्यासाठी खरोखरच लाखोंमध्ये खर्च येतो का? असा प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडला असेल. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 16 सिरीजमधील सर्वात महागडे मॉडेल आयफोन 16 प्रो मॅक्स हा कंपनीचा सर्वात महागडा फोन आहे. याची किंमत 1 लाख 30 हजारांपेक्षा जास्त आहे. काही हजारांमध्ये तयार होणारा हा फोन महाग का विकला जातो ते जाणून घेऊयात.
आयफोन तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. मात्र अॅपल कंपनी आमच्याकडून दुप्पटपेक्षा जास्त पैसे का आकारते, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आज आम्ही तुम्हाला आयफोन 16 प्रो मॅक्स तयार करण्यासाठी किती खर्च येतो याची माहिती सांगणार आहेत. तसेच हा फोन महाग का विकला जातो हेही सांगणार आहोत.
आयफोन 16 प्रो मॅक्सचा उत्पादन खर्च
मार्केट रिसर्च फर्म टीडी कोवेनने दिलेल्या माहितीनुसार आयफोन 16 प्रो मॅक्सच्या बिल ऑफ मटेरियल (BOM) चा खर्च 485 डॉलर (41992 रुपये) आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ही किंमत आयफोन 15 प्रो मॅक्सच्या 453 डॉलर (सुमारे 39222 रुपये) उत्पादन खर्चापेक्षा थोडी जास्त आहे.
42 हजारांमध्ये तयार होणारा फोन लाखोंना का विकला जातो?
समोर आलेल्या माहितीनुसार, BOM मध्ये फक्त कच्चा माल आणि असेंब्लीचा खर्च समाविष्ट असतो, मात्र फायनल किंमतीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग आणि लॉजिस्टिक्ससारखे खर्च सामील केले जातात, त्यामुळे फोनची किंमत वाढते. त्यामुळे 42 हजारांना तयार होणारा आयफोन 16 प्रो मॅक्सचा 256 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 1,32,990 रुपयांना विकला जात आहे.
काही भागांची किंमत जास्त
अहवालानुसार, आयफोन 15 प्रो मॅक्सच्या तुलनेत आयफोन 16 प्रो मॅक्स या हँडसेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्डवेअरमुळे आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत वाढली आहे. 16 प्रो मॅक्सचा डिस्प्ले आणि रियर कॅमेरा सिस्टम हे दोन सर्वात महागडे भाग आहेत ज्यांची किंमत 6700 रुपये होती, तर 15 प्रो मॅक्समध्ये या भागांची किंमत 3600 रुपये आणि 5900 रुपये होती.
उत्पादन खर्चात वाढ
आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात नवीन LPDDR5X रॅम तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रॅमची किंमत 1400 रुपये आहे तर आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये जुनी LPDDR5 रॅमची किंमत फक्त 1000 रुपये होती. तसेच आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये A18 प्रो चिपसेट आणि स्टोरेजची किंमत अनुक्रमे 3400 रुपये आणि 1900 रुपये आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि लॉजिस्टिक्स वरील खर्च वगळता अॅपल आयफोन 16 प्रो मॅक्सच्या प्रत्येक मॉडेलवर चांगला नफा कमवत असल्याचे समोर आले आहे.
