आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी, iPhone 17 Pro मध्ये मिळणार 3 खास फीचर्स
आयफोनची आगामी सीरीज आयफोन 17 लाँच होण्यास अजून बरेच दिवस आहेत, मात्र आता या फोनबाबत महत्वाची माहिती लीक झाली आहे.

भारतात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आयफोनची आगामी सीरीज आयफोन 17 लाँच होण्यास अजून बरेच दिवस आहेत, मात्र आता या फोनबाबत महत्वाची माहिती लीक झाली आहे. ताज्या अहवालानुसार ग्राहकांना आयफोन 17 प्रोच्या कॅमेऱ्यात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयफोनमधील सध्या मिळणारा कॅमेराही उत्तम क्वालिटीचा आहे, मात्र कंपनी त्यात आणखी सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या आगामी सीरीजमध्ये पुढील फीचर्स देण्याची शक्यता आहे.
पहिले फीचर
अॅपल कंपनी आपल्या आगामी आयफोन 17 सीरीजमध्ये कॅमेरा अपग्रेड करण्याचे संकेत मिळाले आहेत. कंपनी आपल्या आगामी प्रो व्हेरिएंटमध्ये टेलिफोटो कॅमेरा सेन्सरचे रिझोल्यूशन वाढवण्याची शक्यता आहे. सध्याच्या सीरीजमध्ये 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर मिळतो, मात्र आता 17 प्रो मध्ये 48 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर मिळू शकतो. याचा अर्थ 17 प्रोच्या बॅक साईटला 48 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कॅमेरा क्वालिटी
दुसरे फीचर्स
आणखी एका अहवालानुसार, आयफोन 17 प्रोमध्ये मल्टी-कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर मिळणार आहे. हे फीचर सध्या थर्ड पार्टी अॅप्सद्वारे उपलब्ध आहे, मात्र आता कॅमेरा अॅपमध्ये हे फीचर दिले जाण्याची शक्यता आहे. जर हे फीचर आले तर आपण मल्टीपल लेन्स (अल्ट्रा वाइड आणि टेलिफोटो कॅमेरा) द्वारे व्हिडिओ शूट करु शकणार आहात.
तिसरे फीचर
आयफोन 17 प्रो मध्ये फ्रंट कॅमेरा सेन्सरमध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे. कंपनी फ्रंट कॅमेराचे रिझोल्यूशन दुप्पट करण्याची शक्यता आहे. आता 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सरऐवजी, 24 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. हे नवीन फीचर आयफोन 17 च्या सर्व मॉडेलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. यामुळे सेल्फीची क्वालिटी सुधारणार आहे.
