iPhone यूजर्ससाठी iOS 19 ठरणार गेमचेंजर! जाणून घ्या काय असणार खास
iOS 19 या नव्या अपडेटमुळे iPhone वापरण्याचा अनुभव अधिक स्मार्ट, वेगवान आणि सुलभ होणार आहे. पण याव्यतिरिक्त या अपडेटमध्ये काही खास वैशिष्ट्यंही आहेत, जी तुमच्या iPhone चं संपूर्ण रूप बदलून टाकतील. त्यामुळे iOS 19 हे केवळ एक अपडेट नसून, iPhone चा वापर करण्याचा संपूर्ण अनुभवच बदलवणारा टप्पा ठरणार आहे.

Apple दरवर्षी आपल्या iPhone वापरणाऱ्यांसाठी नवीन iOS अपडेट घेऊन येतं. या वर्षी नजरा लागल्या आहेत त्या iOS 19 कडे! हे अपडेट iPhone वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणारं असू शकतं, विशेषतः AI चा वापर यात मोठ्या प्रमाणावर दिसेल असा अंदाज आहे.
मागच्या iOS 18 मध्ये AI ची सुरुवात झाली होती, पण iOS 19 मध्ये ही गोष्ट एका वेगळ्याच लेव्हलला जाईल असं म्हटलं जातंय. सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत त्या Siri कडून! नवीन सिरी अधिक नैसर्गिक संभाषण करू शकेल आणि “मागच्या आठवड्यातल्या मिटिंगमधील ती महत्त्वाची फाईल शोध” किंवा “अमक्या व्यक्तीला पाठवलेला तो ईमेल दाखव” अशा गुंतागुंतीच्या आज्ञाही समजू शकेल. फोटो एडिट करण्यापासून ते महत्त्वाचे मेसेज ड्राफ्ट करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये सिरी तुमची खरी ‘असिस्टंट’ बनेल, अशी चर्चा आहे.
डिझाइनमध्ये मोठे बदल?
फक्त फीचर्सच नाही, तर iOS 19 मध्ये आयफोनचा लुक आणि फील सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. ॲपलच्या Vision Pro हेडसेटमधील visionOS प्रमाणे अधिक आकर्षक, Translucent Effects, आधुनिक Navigation Bars आणि नवीन प्रकारचे Controls बघायला मिळू शकतात. अगदी रोजच्या वापरातील Camera आणि Messages अॅप्सनाही एक नवा ‘मेकओव्हर’ मिळू शकतो.
प्रवासात भाषेची अडचण संपणार?
iOS 19 मधील एक अत्यंत उपयोगी ठरू शकणारं फीचर म्हणजे एअरपॉड्सच्या मदतीने होणारं रियल-टाइम भाषांतर. यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांसोबत सहजपणे थेट संभाषण करणं शक्य होईल.
आरोग्याची काळजी आणि कामात मदत
ॲपलचं Health App नेहमीच चांगलं राहिलं आहे, पण आता त्यात AI-based Fitness Coaching आणि अधिक चांगलं Food Tracking यांसारखे फीचर्स येऊ शकतात. तसेच, कामासाठी उपयुक्त असलेलं ‘स्टेज मॅनेजर’ हे फीचर आयफोनवरही येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयफोनला मोठ्या स्क्रीनला जोडून कम्प्युटरसारखा अनुभव घेता येईल.
कधी आणि कुणाला मिळणार?
ॲपल साधारणपणे जून महिन्यात होणाऱ्या आपल्या वार्षिक ‘वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स’ (WWDC) मध्ये नवीन iOS ची घोषणा करतं. सामान्य यूजर्ससाठी हे अपडेट सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन लाँचसोबत उपलब्ध होतं. iPhone XR, XS आणि XS Max या जुन्या मॉडेल्सना हे अपडेट मिळणार नाही अशी शक्यता आहे, पण त्यानंतरचे सर्व आयफोन्स, जे सध्या iOS 18 वापरत आहेत, त्यांना iOS 19 अपडेट मिळेल असा अंदाज आहे.