8000mAh बॅटरीसह लवकरच लाँच केला जाईल iQOO चा नवीन गेमिंग फोन
iQOO चा हा नवीन गेमिंग फोन लवकरच भारतीय बाजारात एँट्री घेणार आहे. या फोनमध्ये 144Hz डिस्प्ले, 8000mAh बॅटरी आणि 200MP कॅमेरा यांसारखी दमदार वैशिष्ट्ये असतील असे म्हटले जात आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनचे लीकनुसार फिचर्स आणि किंमत किती आहे ते जाणून घेऊयात

iQOO लवकरच त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15T भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र लाँच होण्यापुर्वीच या फोनची जवळपास सर्व फिचर्स लीक झालेली आहेत. अहवालानुसार हा फोन गेमिंग वापरकर्त्यांना लक्षात ठेऊन डिझाइन करण्यात आला आहे आणि यामध्ये पॉवरफूल प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले यांसारखी वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग आधीच सुरू झाली आहे आणि तो 20 मे 2026 च्या आसपास लाँच होईल असा अंदाज आहे. iQOO 15T मध्ये Dimensity 9500 Monster Edition प्रोसेसर आणि कंपनीची स्वतःची Q3 गेमिंग चिप असण्याची शक्यता आहे. चला तर मग या हँडसेटचे आकर्षक फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.
गेमिंग कामगिरीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित
लीक झालेल्या माहितीनुसार, iQOO 15T मध्ये नवीन Dimensity 9500 Monster Edition प्रोसेसर असेल, जो विशेष लो-लेव्हल ऑप्टिमायझेशनसह डिझाइन करण्यात आला आहे. यात कंपनीची स्वतःची Q3 गेमिंग चिप देखील असू शकते, ज्यामुळे दीर्घ गेमिंग सेशन दरम्यान चांगले फ्रेम रेट्स आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.
Weibo वरील टिपस्टर ‘डिजिटल चॅट स्टेशन’ने दावा केला आहे की, सुरुवातीच्या टेस्टमध्ये फोनने उत्कृष्ट गेमिंग परफॉर्मन्स दिला. अहवालानुसार, Genshin Impact सारखे हेवी गेम्ससुद्धा सुरळीतपणे चालतात. कंपनी या डिव्हाइसला थेट गेमिंग फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये स्थान देत आहे.
डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीमधील उत्कृष्ट अनुभव
iQOO 15T मध्ये 2K रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.82-इंचाचा OLED डिस्प्ले असेल असे म्हटले जाते.
हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालेल अशी अपेक्षा आहे.
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 200MP सॅमसंग HP5 प्रायमरी सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो. तर याफोनच्या समोरच्या बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा देखील अपेक्षित आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 8000mAh बॅटरी, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अहवालानुसार, हा फोन दीर्घकाळ गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी उत्कृष्ट बॅकअप देऊ शकतो.
लॉन्चची तारीख आणि इतर प्रोडक्ट्स
अहवालानुसार, iQOO 15T सुमारे 20 मे 2026 च्या सुमारास लाँच केला जाऊ शकतो. कंपनी त्याच कार्यक्रमात iQOO Pad 6 Pro टॅब्लेट आणि iQOO TWS 5i इअरबड्सचे देखील लाँच करू शकतात. चीनमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि सुरुवातीच्या खरेदीदारांना काही प्रमोशनल ऑफर्स मिळत आहेत. हा फोन 8GB+256GB पासून ते 16GB+512GB पर्यंतच्या अनेक स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप भारतात या फोनच्या लाँचची अधिकृत घोषणा केली नसली तरी, जागतिक बाजारपेठेत या फोनसाठी उत्साह झपाट्याने वाढत आहे.