iQOOचा 8,000mAh बॅटरी क्षमतेचा हा नवीन फोन लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
iQOO ने लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन iQOO Z10 Turbo+ लाँच करण्याची पुष्टी केली आहे. हा फोन पॉवरफुल प्रोसेसर आणि 8000mAh बॅटरीसह येईल. यासोबतच या फोनमध्ये प्रीमियम फीचर्स देखील उपलब्ध असू शकतात. चला तर मग या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. अशातच iQOO या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहेत. तर या कंपनीने टर्बो सिरीजमधील iQOO Z10 Turbo+ हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार असल्याची पुष्टी केली आहे. शुक्रवारी कंपनीने Weibo वर चीनमध्ये त्यांच्या नवीन Turbo सिरीज डिव्हाइसच्या आगमनाबद्दल एक टीझर जारी केला. यासोबतच फोनच्या प्रोसेसर आणि बॅटरीबद्दल माहिती देखील देण्यात आली आहे. हे नवीन मॉडेल Z10 Turbo सिरीजमध्ये सामील होईल, ज्यामध्ये आधीच Z10 Turbo आणि Z10 Turbo Pro समाविष्ट आहे. Z10 Turbo मध्ये MediaTek Dimensity 8400 प्रोसेसर आहे, तर Pro व्हेरिएंटमध्ये Snapdragon 8s Gen 4 चिपसेटसह येतो.
iQOO Z10 Turbo+ लाँच माहिती
iQOO ने Weibo पोस्टद्वारे पुष्टी केली आहे की iQOO Z10 Turbo+ लवकरच लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन MediaTek च्या Dimensity 9400+ प्रोसेसरने सुसज्ज असेल आणि त्यात मोठी 8,000mAh बॅटरी असेल.
तर हा स्मार्टफोन कधी लाँच होईल याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, रिपोर्ट्सनुसार iQOO Z10 Turbo+ अलीकडेच गीकबेंचवर Vivo V2507A मॉडेल नंबरसह सूचीबद्ध करण्यात आला होता.
मागील लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, iQOO Z10 Turbo+ मध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. याशिवाय यात 6.78-इंच 1.5K रिझोल्यूशन AMOLED स्क्रीनसह येऊ शकते, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट असू शकतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनीचा 50MP LYT-600 मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो, तर समोर 16MP सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
हा फोन Z10 टर्बो सीरीजमध्ये सामील होईल, ज्यामध्ये एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Z10 टर्बो आणि Z10 टर्बो प्रोचा समावेश आहे. Z10 टर्बोमध्ये डायमेन्सिटी 8400 प्रोसेसर आहे आणि प्रो व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर आहे. दोन्ही डिव्हाइसेसमध्ये Q1गेमिंग चिप आहे आणि IP65 रेटिंगसह ते धूळ आणि स्प्लॅश प्रूफ देखील आहेत.
