AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओची उत्तम ऑफर, 3 महिन्यांच्या रिचार्जवर मिळणार 1 महिना मोफत डेटा आणि ओटीटी लाभ

रिलायन्स जिओने त्यांच्या जिओ होम ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर लाँच केली आहे. कंपनी प्रत्येक तीन महिन्यांच्या रिचार्जवर अतिरिक्त एक महिन्याची मोफत वैधता देणार आहे, ज्यामुळे एकूण चार महिन्यांचा लाभ मिळेल. चला तर मग जिओच्या या खास ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

जिओची उत्तम ऑफर, 3 महिन्यांच्या रिचार्जवर मिळणार 1 महिना मोफत डेटा आणि ओटीटी लाभ
Jio Recharge
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 3:55 PM
Share

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर घेऊन आले आहे. कंपनीने X वर एक पोस्ट शेअर करून या बेस्ट ऑफरची घोषणा केली आहे. तर जिओच्या या रिचार्ज ऑफरमध्ये तीन महिन्यांच्या जिओ होम प्लॅनसोबत एक महिन्याची मोफत वैधता दिली जात आहे. याचा अर्थ असा की, तीन महिन्यांच्या रिचार्जवर तुम्हाला चार महिन्यांचे फायदे मिळतील.

ज्यांना जिओ होमबद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी ही एक ब्रॉडबँड सेवा आहे जी मनोरंजनाचे फायदे देखील देते. ग्राहकांना इंटरनेट, मनोरंजन आणि लाईव्ह टीव्ही हे सर्व एकाच प्लॅनमध्ये मिळते. चला तुम्हाला या ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तुम्ही जर नवीन जिओ होम कनेक्शन खरेदी केले तर तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यांच्या रिचार्जवर एका महिन्याचा अतिरिक्त लाभ मिळेल.

जिओचा 555 रूपयांचा प्लॅन

555 रूपयांचा हा तीन महिन्यांच्या वैधतेचा एक एंट्री-लेव्हल प्लॅन आहे. कंपनी आता या प्लॅनसोबत एक महिन्याची अतिरिक्त वैधता देणार आहे. या प्लॅनमध्ये 30Mbps चा स्पीड मिळतो. यामध्ये दरमहा 1000GB डेटा, तसेच 800 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 10 ते 12 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. 555 रूपयांचा प्लॅन तीन महिन्यांसाठी रिचार्ज केल्यास GST सह 2,222 रूपये शुल्क भरावे लागेल.

जिओ 833 रूपयांचा प्लॅन

जिओचा 833 रूपयांचा हा जिओ होम प्लॅन 100Mbps स्पीडसह येतो. GST नंतर या तीन महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत 3,333 असेल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि OTT लाभांसोबतच दरमहा अंदाजे 1000GB डेटा देखील मिळतो.

जिओ होम 100 एमबीपीएस प्लॅन

एक 100Mbps प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये दरमहा 1000GB डेटा, कॉलिंग आणि 16 OTT फायदे मिळतात. हा प्लॅन वापरकर्त्यांना 833 रुपयांच्या प्लॅनपेक्षा जास्त OTT फायदे देतो. 16 OTT फायद्यांसह मासिक प्लॅनची ​​किंमत 1199 रुपये आहे आणि GST सह हा प्लॅन तीन महिन्यांसाठी 4 हजार 444 रुपयांना उपलब्ध आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?