AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Down : अरे भावा कॉल सुद्धा लागत नाहीये, जिओची सेवा झाली ठप्प, इंटरनेट आणि कॉलिंगला मोठा फटका, विसर्जनाच्या दिवशी ग्राहक हैराण

Jio Service Down : जिओची सेवा मंगळवारी दुपारी अचानक कोलमडली. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यानाराजीने ग्राहकांनी मीम्सचा पाऊस पाडला. या पोस्टमुळे ही सेवा गंडल्याचे समोर आले आहे. आऊटेज ट्रॅक करणारी साईट Downdetector ने सेवा विस्कळीत झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Jio Down : अरे भावा कॉल सुद्धा लागत नाहीये, जिओची सेवा झाली ठप्प, इंटरनेट आणि कॉलिंगला मोठा फटका, विसर्जनाच्या दिवशी ग्राहक हैराण
जिओची सेवा कोलमडली
| Updated on: Sep 17, 2024 | 2:13 PM
Share

जिओची सेवा मंगळवारी दुपारी अचानक ठप्प झाली. त्यानंतर याविषयीच्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पूर आला. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली. अनके युझर्सने कमेंट आणि मीम्स पोस्ट केल्या. त्यात जिओ डाऊन झाल्याची माहिती दिली. आऊटेज ट्रॅक करणारी साईट Downdetector ने सेवा विस्कळीत झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अनेक ग्राहकांना सेवा ठप्प झाल्याचा फटका बसला आहे.

10 हजार तक्रारी

Downdetector वर एका तासात 10 हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. ग्राहकांनी इंटरनेट, कॉलिंग ठप्प पडल्याचे म्हटले आहे. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची ओरड तक्रारीत दिसली. यामधील 67 टक्के युझर्सने नो सिग्नल अशी तक्रार नोंदवली आहे. तर काहींनी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे म्हटले आहे. तर 14 टक्के ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा Jio Fiber चा वापर करु शकत नसल्याची तक्रार केली आहे.

जिओची सेवा विस्कळीत

मुंबईला सर्वाधिक फटका

जिओची सेवा कोलमडल्याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईत दिसून आला. यामुळे अनेक ग्राहकांना जिओच्या सेवेचा लाभ घेता येत नाहीये. एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक युझर्सने जिओ सेवेविषयी पोस्ट आणि तक्रारी केल्या आहेत. एका युझरने Jio SIM आणि Jio Fiber सेवा चालत नसल्याचे म्हटले आहे. तर कंपनीकडून अद्याप याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

एक्सवर #jiodown ट्रेडिंग

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Jio Down हा शब्द ट्रेंड होत आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर #jiodown ट्रेडिंगमध्ये आहे. यावर अनेक मीम्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. जिओ ही भारतातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली टेलिकॉम कंपनी आहे. तिची सेवा कोलमडल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आज गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकांना विसर्जनाचे फोटो, बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे होते. तर काहींना एकमेकांशी संपर्कात राहताना सुद्धा अडचणीत येत आहेत. सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांनी नाराजी आणि संतापाला सोशल मीडियावर वाट मोकळी करुन दिली आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.