Jio ने सुरू केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स, मिळेल इतके GB डाटा; अमर्यादित कॉल आणि खूप काही

Jio recharge plan : जिओने प्रिपेड पोर्टफोलियामध्ये दोन नवीन प्लॅन्स जोडलेत. दोन्ही प्लॅन्स 2.5 GB डाट्यासह येत आहेत. कंपनीने हे प्लॅन्स जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केले आहेत.

Jio ने सुरू केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन्स, मिळेल इतके GB डाटा; अमर्यादित कॉल आणि खूप काही
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 7:47 PM

नवी दिल्ली : जिओने नवीन रिचार्ज प्लॅन्स सुरू केलेत. दोन्ही प्लॅन्समध्ये 2.5 GB डाटा आहे. ग्राहकांना या डाटाशिवाय कॉलिंग, एसएमएस सुविधा मिळतील. जिओने हे प्लॅन्स ३० दिवस आणि ९० दिवस व्हॅलिडीटीसह सुरू केलेत. तुम्ही जास्त इंटरनेटचा वापर करत असाल, तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी आहेत. कंपनीने ८९९ रुपये आणि ३४९ रुपये प्रिपेड रिचार्ज प्लॅन्स नवीन सुरू केलेत. दोन्ही प्लॅन्समध्ये सारख्याच सुविधा आहेत. जिओने नवीन वर्षानिमित्त २०२३ रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे.

जिओचा ८९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन्स

ग्राहकांला रोज २.५ जीबी डाटा मिळेल. ग्राहकाला ९० दिवसांची व्हॅलिडीटी मिळेल. ग्राहकाला पूर्ण २२५ जीबी डाटा मिळेल. जिओ अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि रोज १०० एसएमएसचा फायदा मिळेल.

याशिवाय जिओ कॅमेरा, जिओ सेक्युरिटी, जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्ही याचाही वापर ग्राहक करू शकतील. हा रिचार्ज डाटा खरेदी करणारे युजर्स 5 जीसाठी पात्र ठरतील.

३४९ रुपयांचा जिओ प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ३० दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. सर्व सुविधा वरच्या प्लॅनसारख्याच आहेत. रिचार्जमध्ये ग्राहकाला ७५ जीबी डाटा मिळेल. ग्राहकांना रोज २.५ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस करता येतील. सोबत जिओ अॅप्सचा मोफत एक्सेस मिळेल. हा प्लॅन ५ जी डाट्यासोबत आहे.

५ जी एलिजीबीलीटीचा अर्थ काय?

5 जी एलिजीबीलीटीचा अर्थ ग्राहकाला ५ जी डाटा मिळेल. हे प्लॅन्स खरेदी करणारे ग्राहक ५ जी नेटवर्कचा वापर करू शकतील. त्यांनी जिओचा वेलकम ऑफर मिळाला तर. यासाठी ग्राहकांकडे ५ जी स्मार्टफोन हवा. त्यासाठी ५ जीचा भाग असला पाहिजे. जिओ ऑफर मोजक्या ग्राहकांना मिळत आहे. कंपनी ज्यांना ऑफर देईल, त्यांनाच याचा फायदा मिळेल.

Jio recharge plan : जिओने प्रिपेड पोर्टफोलियामध्ये दोन नवीन प्लॅन्स जोडलेत. दोन्ही प्लॅन्स 2.5 GB डाट्यासह येत आहेत. कंपनीने हे प्लॅन्स जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केले आहेत. डाटासह रिचार्ज प्लॅन्सनुसार ग्राहकांना कॉलिंग तसेच एसएमएस सुविधा मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.