Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?

आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi (वोडाफोन आयडिया) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या डेटा प्लॅनसविषयी माहिती देणार आहोत.

Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?

मुंबई : सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे डेटा प्लॅन्स लाँच करत आहेत. तसेच वेगवेगळ्या ऑफर्सही सादर करत आहेत. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi पैकी कोणाचा डेटा प्लॅन स्वस्त आहे? कोणती कंपनी कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त डेटा देतेय? याबाबत युजर्सना पुरेशी माहिती नसते. ग्राहकांना ते ज्या टेलिकॉम कंपनीचं सिम कार्ड वापरतायत केवळ त्याच कंपनीच्या डेटा प्लॅन्सविषयी माहिती असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi (वोडाफोन आयडिया) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या डेटा प्लॅनसविषयी माहिती देणार आहोत. प्रामुख्याने 1 जीबी डेटा प्लॅन्सची तुलनात्मक माहिती सादर करत आहोत. (Jio vs Airtel vs Vi : Which company have best 1GB data plan?)

Jio चा 1GB दैनिक डेटा प्लॅन

जियोच्या 1GB दैनिक डेटा प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा, 100 SMS आणि फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लॅनची वैधता केवळ 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला जियो अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जातं.

Airtel चा 1GB दैनिक डेटा प्लॅन

एयरटेल कंपनी 199 रुपयांमध्ये 1 जीबी दैनिक डेटा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधा दिली जाते. या प्लॅनची वैधता केवळ 24 दिवसांची आहे. सोबतच कंपनी तुम्हाला हॅलोट्युन्स, विंक म्युझिक आणि एयरटेल एक्स्ट्रिम प्रिमियमचं मोफत सब्सक्रिप्शन देते.

Vi चा 1GB दैनिक डेटा प्लॅन

वोडाफोन आइडिया (Vi) च्या 1GB दैनिक डेटावाल्या प्लॅनची किंमत 219 रुपये इतकी आहे. यामध्ये फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएसमएसची सुविधा दिली जाते. सोबतच ग्राहकांना Vi मुव्हिज अँड TV या अॅपचा अॅक्सेस दिला जातो.

तिन्ही कंपन्यांमध्ये जियो कंपनी सर्वात स्वस्त 1 जीबी दैनिक डेटा प्लॅन देते, तर वोडाफोन आयडिया (Vi) ही कंपनी सर्वात महागडा प्लॅन देते.

संबंधित बातम्या

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

पुढील वर्षी 5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार? सरकारचे प्रयत्न सुरु

(Jio vs Airtel vs Vi : Which company have best 1GB data plan?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI