Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

नव्या वर्षात अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनी सज्ज झाली आहे.

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

मुंबई : नव्या वर्षात (New Year 2021) अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनी सज्ज झाली आहे. कंपनीने ग्राहकांसाठी शानदार प्लॅन्स सादर केले आहेत. BSNL ने नुकताच नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने 199 रुपयांचा नवा प्लान वाऊचर सादर केला आहे ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबीपर्यंत हाय स्पीड डेटा मिळणार आहे. (BSNL Prepaid plan to compete with Airtel and Jio; users will get double data)

BSNL च्या या 199 रुपयांच्या प्लॅन वाऊचरमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजरला एकूण 60 जीबी डेटा दिला जातोय. बीएसएनएल कंपनी गेल्या काही दिवसांपासून चांगल्या ऑफर्स सादर करुन जियो, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांना टक्कर देत आहे. या एअरटेल आणि जियोने नुकताच 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला होता. बीएसएनएलचा प्लॅन त्यांच्यापेक्षा दमदार आहे.

जियोकडून दिवसाला 1.5 जीबी डेटा

जियो कंपनी 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच कंपनी 199 रुपयांमध्ये एकूण 42 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असली तरी अन्य नेटवर्कसाठी 3 हजार मिनिटं दिली जात आहेत. तसेच 100 फ्री एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे.

Airtel महागडं, डेटा मात्र कमी

Airtel चे प्लॅन सर्वात महाग आहे. Airtel च्या199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता केवळ 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज केवळ 1 जीबी डेटा दिला जातोय. याचाच अर्थ Airtel 199 रुपयांमध्ये केवळ 25 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा दिली आहे.

BSNL चा 251 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन

दरम्यान, BSNL कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी नुकताच 251 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही कॉलिंग अथवा एसएमएस बेनिफिटशिवाय केवळ 70 जीबी डेटा मिळेल.

BSNL ने या प्लॅनसोबत अजून एक 151 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच कंपनीने सर्वात स्वस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन सादर केला आहे. 10 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा दिला जात असून या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 56 रुपये मोजावे लागणार आहेत. बीएसएनएलचे हे प्लॅन्स इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहेत.

देशात जियो कंपनी सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स देते असा लोकांचा गेल्या काही महिन्यांपासूनचा समज आहे. परंतु बीएसएनल कंपनी त्याला छेद देण्याच्या तयारीत आहे. कारण बीएसएनएल कंपनी 251 रुपयांमध्ये 70 जीबी डेटा देत आहे. तर रिलायन्स जियो 251 रुपयांमध्ये युजर्सना केवळ 50 जीबी डेटा देते. जियोच्या या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्येदेखील कॉलिंग अथवा एसएमएसची सुविधा दिली जात नाही.

संबंधित बातम्या

BSNL कडून 251 रुपयांत 70GB डेटा; जाणून घ्या जियो, एयरटेल आणि Vi चे प्लॅन्स

Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

(BSNL Prepaid plan to compete with Airtel and Jio; users will get double data)