‘जिओ’ला टक्कर, व्होडाफोनचा भन्नाट प्लॅन लाँच

मुंबई : व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोठ्या कंपन्या लवकरच एकत्र होत आहेत. असं असलं तरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्होडाफोनने एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. जिओने मोबाईल टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यापासून अनेक मोबाईल कंपन्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी 159  रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनअंतर्गत व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना […]

‘जिओ’ला टक्कर, व्होडाफोनचा भन्नाट प्लॅन लाँच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोठ्या कंपन्या लवकरच एकत्र होत आहेत. असं असलं तरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्होडाफोनने एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. जिओने मोबाईल टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यापासून अनेक मोबाईल कंपन्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी 159  रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनअंतर्गत व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना 159 रुपयांमध्ये प्रतिदिन 1 GB डेटा, अनलिमीटेड कॉलिंग आणि 100 SMS करता येणार आहेत. ही सेवा 28 दिवसांसाठी असेल.

विशेष म्हणजे, व्होडाफोनचा हा प्लॅन जिओ आणि एअरटेल यांच्या 149 रुपयांच्या प्लॅनच्या जवळ जाणारा आहे. एअरटेल 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीमध्ये प्रतिदिन 1 GB डेटा आणि 100 SMS तर याकाळात अनलिमिटेड कॉलिंग सेवा उपलब्ध आहे. जिओ 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांसाठी 28 दिवसांमध्ये प्रतिदिन 1.5 GB डेटा आणि अनलिमीटेड कॉलिंग, SMS करण्याची सेवा देत.

व्होडाफोनच्या या नवीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगमध्ये दिवसाला केवळ 250 मिनिटांची तर आठवड्याला 1000 मिनिटांची मर्यादा असणार आहे. तर याकाळात 100 पेक्षा अधिक युनिक नंबरवर कॉल करता येणार नाही. तर प्रतिदिन 100 SMS मिळणार आहेत.

व्होडाफोनचा हा 159 रुपयांचा प्लॅन केवळ 4G ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. व्होडाफोनची एअरटेल आणि जिओसोबत तुलना केली तर यामध्ये फारसा फरक जाणवत नाही. मात्र, व्होडाफोनच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 10 रुपये अधिक द्यावे लागतील.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.