अवघ्या 1999 रुपयात दोन वर्षांसाठी कॉलिंग, डेटा आणि Phone FREE

अवघ्या 1999 रुपयात दोन वर्षांसाठी कॉलिंग, डेटा आणि Phone FREE
Jiophone Offer

आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फोनसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा मिळतील, त्याही केवळ 1999 रुपयांमध्ये रुपयांमध्ये.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 04, 2021 | 12:09 AM

मुंबई : दरमहा रिचार्ज करणे खूप त्रासदायक आहे, म्हणून जर आपल्याला असा एखादा प्लॅन मिळाला ज्यात दोन वर्षे अर्थात 730 दिवसांसाठी सर्व काही विनामूल्य उपलब्ध असेल तर लॉटरी लागल्यासारखंच आहे, नाही का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फोनसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा मिळतील, त्याही केवळ 1999 रुपयांमध्ये रुपयांमध्ये. (JioPhone : get data, calling and phone for FREE for 2 years in just Rs 1999)

ही ऑफर जिओने (Jio) सादर केली आहे आणि यात तुम्हाला दोन वर्षांसाठी अवघ्या 1999 रुपयात सर्वकाही विनामूल्य मिळेल आणि त्यासोबत जिओफोन (JioPhone) देखील विनामूल्य मिळेल. यासह, आपल्याला दरमहा 2 जीबी डेटा मिळेल, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच आपण सर्व Jio अॅप्सचा विनामूल्य अॅक्सेस मिळवू शकता.

1499 रुपयांमध्येदेखील सर्वकाही फ्री

1999 च्या दोन वर्षांच्या प्लॅनसह जिओने 1499 रुपयांचा प्लॅनदेखील सादर केला आहे, ज्यात तुम्हाला एका वर्षासाठी JioPhone सह सर्व काही विनामूल्य मिळेल. यात तुम्हाला एका वर्षासाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दरमहा 2 जीबी डेटाचा लाभ देण्यात येईल.

JioPhone मध्ये काय आहे खास?

हा फोन KaiOS वरच चालतो आणि तुम्ही या फीचर फोनवर FACEBOOK, YOUTUBE आणि WHATSAPP सारखे अॅप्सदेखील वापरू शकता. यामध्ये तुम्ही 4G स्पीडने इंटरनेट वापरु शकता. याचं कॉम्पॅक्ट डिव्हाईस या फोनला अधिक युजर फ्रेंडली बनवतो. तसेच यामध्ये 320 x 240 पिक्सेल रिजोल्यूशनसह 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले मिळेल. यात 1.2GHz ड्युअल कोर प्रोसेसर आहे आणि हा फोन 512MB रॅमसह सादर करण्यात आला आहे, जो मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे वाढविला जाऊ शकतो. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

1.60 लाखाची Royal Enfield Thunderbird 350 अवघ्या 53 हजारात खरेदीची संधी

Honda च्या बाईक आणि स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, लिमिटेड ऑफर

(JioPhone : get data, calling and phone for FREE for 2 years in just Rs 1999)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें