Honda च्या बाईक आणि स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, लिमिटेड ऑफर

Honda च्या बाईक आणि स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, लिमिटेड ऑफर
Honda X-Blade

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना ढासू ऑफर देत असते.

अक्षय चोरगे

|

May 30, 2021 | 3:32 PM

मुंबई : होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना ढासू ऑफर देत असते. कंपनीने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट डिस्काउंट ऑफर सादर केली आहे, ज्यामध्ये ग्राहक होंडा एक्स-ब्लेड (Honda X-Blade) बाईकवर 3500 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कंपनी ही ऑफर मर्यादित काळासाठी देत ​​आहे. 30 जूनपर्यंत ग्राहक या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. (Honda X-Blade bike awailable with bumper discount)

Honda X-Blade वर देण्यात आलेली ऑफर केवळ तेच ग्राहक क्लेम करु शकतात जे ही बाईक ईएमआयवर खरेदी करतील. याशिवाय या ऑफरचा फायदा कंपनी आपल्या इतर बाईक्स आणि स्कूटर्सवरही देत आहे, यामध्ये तुम्ही होंडा शाईन ही बाईक सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात.

होंडाच्या ‘या’ मॉडेल्सवर कॅशबॅक मिळेल

होंडा मोटारसायकल आपल्या Honda Shine, Honda Hornet 2.0, Honda Grazia 125, Honda Activa 6G आणि Honda Dio सारख्या बाईक आणि स्कूटर्सवर कॅशबॅक ऑफर देत आहे. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 40 हजार रुपयांचं ट्रान्झॅक्शन करावं लागेल.

Honda X-Blade ची खासियत आणि फीचर्स

Honda X-Blade दुचाकी गेल्या वर्षी बाजारात सादर करण्यात आली होती. यात 162.71cc एयर-कूल्ड इंजिन आहे जे 14bhp पॉवर आणि 15Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन फाइव्ह-स्पीड ट्रान्समिशनसह येतं. त्याच्या सस्पेंशन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फोर्कसह मोनो शॉक आहे. यासह, त्याच्या फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. तथापि, ग्राहक रियरमध्येदेखील डिस्क ब्रेक घेऊ शकतात.

या बाईकच्या फीचर्सविषयी सांगायचे तर यात फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लाइट आणि एक हॅझार्ड स्विच आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.09 लाख ते 1.14 लाख रुपयांदरम्यान आहे. ही बाईक अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमने (एबीएस) सुसज्ज आहे. यात फ्रंटला टेलीस्कोपिक आणि मागील बाजूस हायड्रॉलिक मोनोशॉक सस्पेंशन आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.09 लाख ते 1.14 लाख रुपयांदरम्यान आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदला, Gogoro Viva Electric Scooter भारतात लाँच होणार

(Honda X-Blade bike awailable with bumper discount)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें