AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JioPhone Next 10 सप्टेंबरला बाजारात, अवघ्या 500 रुपयांत खरेदी करता येणार, जाणून घ्या संपूर्ण डील

Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी रिलीजसाठी सेट आहे.

JioPhone Next 10 सप्टेंबरला बाजारात, अवघ्या 500 रुपयांत खरेदी करता येणार, जाणून घ्या संपूर्ण डील
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी रिलीजसाठी सेट आहे, जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. परंतु, जिओफोन नेक्स्टच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, कंपनी लोकांना विविध पर्याय देऊ इच्छिते जे विस्तृत सेल्स स्ट्रक्चरप्रमाणे आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ फोन नेक्स्ट, जो 500 रुपयांत खरेदी करता येईल, परंतु इथे एक अडचण आहे. (JioPhone Next sale starts from 10 september as low as 500 rupees)

ईटी नाऊच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ अनेक भारतीय बँका आणि कर्ज देणाऱ्या भागीदारांसोबत भागीदारी करून विविध पेमेंट मोडद्वारे जिओफोन नेक्स्ट विकणार आहे. टेलिकॉम कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अॅश्योर आणि डीएमआय फायनान्स यांच्यासोबत कोलाबोरेट करू शकते. कंपनीने जे लक्ष्य ठेवले आहे की, ते पुढील 6 महिन्यांत 50 मिलियन युनिट्सची विक्री करून 10,000 कोटी पर्यंतचा व्यवसाय करणार आहेत.

JioPhone हे ईजी सेल्स मॉडल असेल. तथापि, येथे आपल्याला रेग्युलर वन टाइम पेमेंट ऑप्शन मिळेल. पण रिलायन्स जिओला ग्राहकाने कोणत्याही किंमतीत फोन खरेदी करावा असे वाटते. यासाठी जिओ सुरुवातीला ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेणार नाही.

जियोफोन नेक्स्ट आणि सेल

रिपोर्टनुसार, कंपनी दोन जिओफोन नेक्स्ट मॉडेल आणणार आहे. एक बेसिक जिओफोन नेक्स्ट असेल ज्याची किंमत 5000 रुपये असेल, तर दुसरीकडे जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स असेल ज्याची किंमत 7000 रुपये असेल. ग्राहकाला कोणताही फोन खरेदी करायचा असेल तर त्यांना संपूर्ण किंमत मोजावी लागणार नाही. ते संपूर्ण रकमेच्या केवळ 10 टक्के म्हणजेच 500 रुपये देऊन बेसिक मॉडेल आणि अॅडव्हान्स मॉडेल खरेदी करू शकतात. यानंतर, त्यांना उरलेले पैसे बँक आणि कर्ज देणाऱ्या भागीदाराला द्यावे लागतील. येथे हे स्पष्ट आहे की, तुम्हाला हा फोन हप्त्यांमध्ये घ्यावा लागेल.

रिलायन्स जिओने एनबीएफसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकाने फोन खरेदी केला तर त्याला थोडी जास्त रक्कम मोजावी लागेल. म्हणजेच 5000 रुपये किंमतीचा फोन ईएमआय लागू केल्यानंतर अधिक किमतीचा असेल. मात्र, ही रक्कम किती असेल आणि फोनची मूळ किंमत किती असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

कोणते फीचर्स मिळणार?

जिओ फोन नेक्स्टमध्ये क्वालकॉम द्वारे लो एंड चिपसेट देण्यात येईल. रहमान यांच्या ट्विटनुसार, डिव्हाइसमध्ये क्वालकॉम QM215 प्लॅटफॉर्म दिला जाईल. यात 64 बिट CPU आणि ड्युअल ISP सपोर्ट असेल. फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम देण्यात येईल. त्याच वेळी, स्टोरेजच्या बाबतीत, त्यात 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्यायही दिला जाईल.

इतर स्पेक्स

डिव्हाइसमध्ये 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1440 * 720 पिक्सलचे HD रिझोल्यूशन दिले जाईल. बॅटरीबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु या फोनची बॅटरी 3000 ते 4000mAh च्या दरम्यान असू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्टही दिला जाईल. त्याचबरोबर फोनची किंमत 3500 रुपयांच्या आसपास असू शकते.

इतर बातम्या

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Samsung Galaxy M32 5G बाजारात, आजपासून सेल सुरु, जाणून घ्या किती आहे 5G फोनची किंमत

वर्षअखेरीस Samsung सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(JioPhone Next sale starts from 10 september as low as 500 rupees)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.