Lava ने लॉंच केला त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून व्हाल आश्चर्यचकित
लावाने एका नवीन बजेटमध्ये त्यांच्या स्मार्टफोन लाँच केला आहे. 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच झालेला हा बजेट स्मार्टफोन अनेक उत्तम फीचर्ससह येतो. या स्मार्टफोन तुम्हाला कोणत्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतात ते जाणून घेऊयात?

तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि 7 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी या किमतीत लावा कंपनीने Lava Yuva Smart 2 लाँच केला आहे. हा सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन ऑक्टा कोर प्रोसेसर, ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. याशिवाय या फोनच्या सुरक्षेसाठी तुम्हाला फोनच्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल, हा फोन कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे, तर या फोनमध्ये तुम्हाला फेस अनलॉक सपोर्टचाही फायदा मिळेल.
लावा युवा स्मार्ट 2 ची भारतातील किंमत
या स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे जो 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो, हा व्हेरिएंट तुम्हाला फक्त 6099 रूपयांना खरेदी करता येणार आहे. क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल गोल्ड रंगांमध्ये लाँच झालेल्या या फोनच्या उपलब्धतेबद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, हा लावा स्मार्टफोन मोटोरोला G05, पोको C71, सॅमसंग गॅलेक्सी F05 आणि टेकनो स्पार्क गो २ सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
लावा युवा स्मार्ट 2 चे स्पेसिफिकेशन्स
ऑपरेटिंग सिस्टम आणि डिस्प्ले: अँड्रॉइड 15 गो एडिशनवर चालणारा हा लावा स्मार्टफोन 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 6.5 इंच एचडी प्लस रिझोल्यूशनसह लाँच करण्यात आला आहे.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये ऑक्टा कोर युनिसॉक 9863ए प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
रॅम: फोनमध्ये 3 जीबी रॅम आहे पण 3जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम सहजपणे 6 जीबी पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा सेटअप: या लावा स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल एआय ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि मागील बाजूस एलईडी फ्लॅश आहे. त्यातच या फोनच्या सेल्फीसाठी समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 10 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
