AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lenovo चा अपग्रेडेड IdeaPad Gaming 3i लॅपटॉप बाजारात, आजपासून अमेझॉनवर सेल

लेनोवोने आपल्या ग्राहकांसाठी अपग्रेडेड आयडियापॅड गेमिंग 3i लॅपटॉप लॉन्च केला आहे, जो इंटेल 11 जनरल कोर प्रोसेसर आणि लेटेस्ट Nvidia GeForce RTX 30 Series GPU द्वारे पॉवर्ड आहे.

Lenovo चा अपग्रेडेड IdeaPad Gaming 3i लॅपटॉप बाजारात, आजपासून अमेझॉनवर सेल
Lenovo Laptop
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 6:55 PM
Share

मुंबई : लेनोवोने आपल्या ग्राहकांसाठी अपग्रेडेड आयडियापॅड गेमिंग 3i लॅपटॉप लॉन्च केला आहे, जो इंटेल 11 जनरल कोर प्रोसेसर आणि लेटेस्ट Nvidia GeForce RTX 30 Series GPU द्वारे पॉवर्ड आहे. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 89,990 रुपये इतकी आहे. हा एंट्री-लेव्हल आणि परवडणारा गेमिंग लॅपटॉप चांगल्या डिस्प्लेसह येतो. तरुण, प्रौढ आणि विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (Lenovo Ideapad Gaming 3i laptop launched with upgraded Intel Core i7 11370H CPU in India)

Lenovo IdeaPad Gaming 3i आजपासून amazon.in आणि lenovo.com वरून खरेदी करता येईल. यासह, हा लॅपटॉप लवकरच Flipkart.com आणि इतर ऑफलाइन चॅनेलवर देखील उपलब्ध होईल.

लेटेस्ट कीबोर्ड आणि थर्मल डिझाइनसह, हा लॅपटॉप दैनंदिन कामकाज, गेमिंगच्या आवश्यक गरजा आणि मल्टीटास्किंगसाठी परफेक्ट आहे, असे लेनोवो इंडियाचे ग्राहक व्यवसाय प्रमुख दिनेश नायर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लेनोवोने सांगितले की, ते या डिव्हाइससह एक वर्षाची वॉरंटी, एक वर्षाचा प्रीमियम केअर सपोर्ट आणि एक वर्षासाठी अॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन प्रदान करत आहेत.

Lenovo IdeaPad Gaming 3i स्पेसिफिकेशन्स

हा लॅपटॉप विंडोज 10 होम आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालतो. या गेमिंग लॅपटॉपमध्ये 15.6-इंच फुल एचडी (1,920 × 1,080 पिक्सेल) आयपीएस अँटी-ग्लेअर डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 250 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा इंटेल कोर i7-11370H प्रोसेसरद्वारे पॉवर्ड आहे आणि यात 8GB रॅम आणि 512GB M.2 2280 PCIe 3.0 × 4 NVMe SSD स्टोरेज आहे. या व्यतिरिक्त, याला Nvidia GeForce RTX 3050 GPU 4GB GDDR6 VRAM आणि मॅक्सिमम टोटल ग्राफिक्स पॉवर (TGP) 90W ची देण्यात आली आहे.

ऑडिओबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये दोन 2W स्टीरिओ स्पीकर्स आहेत जे Nahimic Audio सह येतात. हे हाय डेफिनेशन ऑडिओ चिपसह Realtek ALC3287 कोडेक वापरते. यासह, या लॅपटॉपमध्ये 720p वेबकॅम आहे जो शटर आणि कनेक्टिव्हिटी पर्यायांसह येतो. जसे वाय-फाय 6, ब्लूटूथ, थंडरबोल्ट 4 आणि बरेच काही. या व्यतिरिक्त, लेनोवो आयडियापॅड गेमिंग 3i लॅपटॉप मध्ये 45Whr ची बॅटरी आहे, जी रॅपिड चार्ज प्रो ला सपोर्ट करते आणि ती फक्त 30 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकते.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Lenovo Ideapad Gaming 3i laptop launched with upgraded Intel Core i7 11370H CPU in India)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.