5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? निर्णय घेण्याआधी ‘या’ गोष्टी समजून घ्या..

5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? निर्णय घेण्याआधी ‘या’ गोष्टी समजून घ्या..

OnePlus, Redmi, Xiaomi, Realme आणि Samsung सारख्या बऱ्याच ब्रँडनी त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यांच्या किंमती देखील वेगवेगळ्या दिसून येत आहेत. परंतु आताच 5G फोन घेणे घाईचे ठरेल का, असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. त्याला कारण देखील तसेच सांगण्यात येत आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 16, 2022 | 5:57 PM

भारतात 5G नेटवर्क (5G network) अद्याप लाँच व्हायचे आहे आणि येत्या काही महिन्यांत देशात 5G स्पेक्ट्रम लिलाव होण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु आपल्याकडे आधीच एक सेटअप असून त्या माध्यमातून तुम्ही देशात 5G इनबिल्ट फोनची सहज आणि कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात. OnePlus, Redmi, Xiaomi, Realme आणि Samsung सारख्या बऱ्याच ब्रँडनी त्यांचे 5G स्मार्टफोन (smartphone) बाजारात आहेत. त्यांच्या किंमती देखील फरक दिसून येत आहे. आहेत. परंतु आताच 5G फोन (5G smartphone) घेणे घाईचे ठरेल का, असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. त्याला कारण देखील तसेच सांगण्यात येत आहे. परंतु सध्या ग्राहकांनी 4G वरच कायम रहावे की,  5G फोनवर शिफ्ट व्हावे, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखातून देणार आहोत.

5G स्मार्टफोनमध्ये काय मिळतं?

 

जेव्हा तुम्ही 5G स्मार्टफोन बाबत विचार करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की 5G ला क्वालकॉम किंवा मीडियाटेक प्रोसेसर देण्यात येत आहे. या दोन्ही चिपसेट निर्मात्यांनी इनबिल्ट 5G मॉडेमसह मोबाइलसाठी नवीन SoC लाँच केले आहेत. म्हणून, जेव्हा फोन निर्माते त्यांच्याकडून हे चिपसेट विकत घेतात, तेव्हा ते मेनस्ट्रीमलाइनमध्ये नसलेल्या तंत्रज्ञानासाठी प्रीमियम सेवा देतात. 5G फोन खरेदी करण्यासाठी बाजारात सध्या असलेले ब्रँड तुमच्याकडून प्रीमियम आकारतात. जरी आज तुम्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G फोन सहज खरेदी करू शकता, तरी जेव्हा तुम्ही त्याच किंमतीत 4G फोनसोबत 5G डिव्हाइसची तुलना करता तेव्हा तुम्हाला फीचर्समध्ये मोठा फरक दिसतो.

5G व्यतिरिक्त फीचर्सही महत्त्वपूर्ण

 

एक सर्वसामान्य ग्राहक जेव्हाही फोन खरेदी करतो तेव्हा त्याला त्यात फक्त 5G हे एकच डोळ्यासमोर दिसत असते. परंतु त्याच वेळी आपण इतर फीचर्सकडेही लक्ष दिले पाहिजे. भारतात अजून 5G नेटवर्क सुरू झालेले नाही. यास सहा महिनेही लागू शकतात. त्यामुळे, जर तुम्ही 2022 मध्ये 5G फोन विकत घेत असाल, तर तुम्ही केवळ 5G वरच लक्ष केंद्रीत न करता कॅमेरा, डिसप्ले आणि बॅटरी यासारख्या गोष्टींवरदेखील लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
देशात डेटाचा स्पीड किती वेगवान होणार आहे, हे कोणालाही माहिती नसतानाही अनेक ब्रँडने खरेदीदारांसाठी 5G ची विक्री केली आहे. तरीही लोक 5G कडे आपला मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे तुम्ही 5G फोन विकत घेण्याचा निर्णय घेतल्यास, फोन 5 पेक्षा जास्त नेटवर्कला सपोर्ट करत आहे, की नाही याची खात्री केली पाहिजे.

भारतात 5G लाँच केल्याने 4G चे काय होणार?

अनेक जाणकारांच्या मते 4G चे नेटवर्क कायम राहणार आहे. 5G नेटवर्क लाँच हळूहळू होईल आणि नंतर कदाचित हळूहळू 4G ची मागणी कमी होईल परंतु ती पूर्णपणे संपणार नाही. त्यामुळे, जर तुम्ही
आता 4G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर त्याचा वापर तुम्ही निःसंकोचपणे लाँग टर्मसाठी करु शकतात.
5G फोनचे काही फायदेही आहेत. ते खरेदी करताना समजून घेणे आवश्यक आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें