Flipkart Mega Sale : फ्लिपकार्टवर मेगा सेल… स्मार्टफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर ऑफर

तुम्ही जर स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, पुढील आठवड्यात फ्लिपकार्टवर नवीन सेल सुरू होणार असून यात तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक सूट मिळणार आहे. या लेखातून सेलवरील ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

Flipkart Mega Sale : फ्लिपकार्टवर मेगा सेल... स्मार्टफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर ऑफर
फ्लिपकार्टवर मेगा सेलImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:11 PM

फ्लिपकार्टवर (Flipkart) ‘बिग बिलियन डेज’ (Big Billion Days) सेल सुरू होणार आहे. 4 मेपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्स मिळू शकतात. हा ऑनलाइन सेल 9 मेपर्यंत सुरु राहणार असून ग्राहकांना स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आकर्षक सूट आणि ऑफर मिळणार आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी F22 (Galaxy F12), Realme C20 आणि Poco M3 सारख्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळेल. सोबतच फ्लिपकार्ट सेलमधून सवलतीत आयफोन देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस आधी या सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्के सूट मिळणार आहे.

Galaxy F12

फ्लिपकार्ट सेलमध्ये हा सॅमसंग फोन 9,999 रुपयांना उपलब्ध होईल. त्याची लिस्टिंग किंमत 14,999 रुपये असून सध्या हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी F22 मध्ये ग्राहकांना 6.4 इंचाचा AMOLED डिसप्ले मिळेल सोबतच मीडियाटेक Helio G80 प्रोसेसर आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध होईल.

Poco M4 Pro

हा पोको फोन कमी किंमतीत दमदार फिचर्ससह उपलब्ध होणार आहे. सेलमधून हा मोबाईल मात्र 13,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हँडसेट Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. यामध्ये मीडियाटेक Helio G96 प्रोसेसर देण्यात आले आहे. फोन 6GB रॅम आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे.

हे सुद्धा वाचा

Redmi Note 10s

रेडमीचा हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. आगामी सेलमध्ये तुम्ही तो फक्त 11,999 रुपयांना खरेदी करू शकाल. Redmi Note 10s मध्ये मीडियाटेक Helio G95 प्रोसेसर आणि 6GB RAM उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिसप्ले असून हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. डिव्हाइसमध्ये 64MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.