मर्सिडिज बेन्झ भारतात पहिल्या स्थानावर

  • Sachin Patil
  • Published On - 22:25 PM, 9 Jan 2019
मर्सिडिज बेन्झ भारतात पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : जर्मनीची लग्जरी कार कंपनी मर्सिडिज बेन्झने भारतात पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे. 2018 मध्ये कारची विक्री 1.4 टक्क्यांनी वाढत 15 हजार 538 यूनिटवर पोहचली असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच मर्सिडिज बेन्झने भारतात चौथ्यांदा आपले पहिले स्थान कायम राखलं असल्याचा दावाही केला आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात कार कंपनीमध्ये स्पर्धा सुरु आहे. त्यात मर्सिडिज, बीएमडब्ल्यू सारखे अनेक मोठे ब्रँड आहेत. दरवर्षी ग्राहकांचा विचार करत अनेक नव-नवीन ब्रँड बाजारात उतरवले जातात. या अशा परिस्थितीत सर्वांना मागे टाकत मर्सिडिजने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

मर्सिडिजने 2017 मध्ये 15 हजार 330 यूनिट कारची विक्री केली होती. तसेच 2018 मध्ये नवीन जनरेशनच्या कार, सिडॅन, एसयूव्ही आणि एएमजी पोर्टफोलियोसोबत सर्व श्रेणींमधील गाड्यांची चांगल्या प्रकारे विक्री झाली होती. असं मर्सिडीजने सांगितलं आहे.

आम्ही 2018 च्या दुसऱ्या सहा महिन्यामध्ये आर्थिक संकाटाना सामोरे गेले होतो अशा अडचणीतूनही आम्ही चांगली विक्री केल्याने समाधानी आहे. आम्ही चौथ्या तिमाहीमध्ये मजबूत अशा परिस्थितीत वापसी करत उत्तम अशी विक्री करण्यात यशस्वी ठरलो. तसेच 2019 आमच्यासाठी महत्वपूर्ण वर्ष असणार आहे. असं मर्सिडिज बेन्झ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी सांगितले.