50 हून अधिक रेडीमेड प्रॉम्प्ट्सचा वापर करून बनवा परफेक्ट व्हिडिओ, तेही काही मिनिटांत

AI च्या सहाय्याने व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्यातच Meta AI चे हे नवीन फिचर केवळ तांत्रिक लोकांसाठी मर्यादित न राहता सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठीही व्हिडिओ एडिटिंग सहजसाध्य करत आहे. मग आता केवळ कल्पना करा, टाइप करा आणि परिणाम समोर पाहा!

50 हून अधिक रेडीमेड प्रॉम्प्ट्सचा वापर करून बनवा परफेक्ट व्हिडिओ, तेही काही मिनिटांत
मेटा एआय
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 14, 2025 | 3:45 PM

व्हिडिओ एडिटिंग ही नेहमीच एक जटिल प्रक्रिया मानली जाते. विशेषतः ज्यांना तांत्रिक ज्ञान कमी आहे त्यांच्यासाठी हे काम अधिक कठीण असते. पण आता Meta AI ने या अडचणीला सोपा पर्याय दिला आहे. Meta ने आपले नवीन स्मार्ट व्हिडिओ एडिटिंग फीचर सादर केले असून, यामुळे अगदी नवशिक्यांनाही प्रोफेशनल दर्जाचे व्हिडिओ तयार करता येणार आहेत तेही केवळ टेक्स्ट कमांड्स वापरून!

काय आहे हे नवीन फीचर?

Meta AI च्या या नव्या फीचरचे नाव आहे प्रॉम्प्ट्स यात वापरकर्ते आपला व्हिडिओ अपलोड करतात आणि त्यानंतर ५० हून अधिक तयार असलेल्या प्रॉम्प्ट्स म्हणजेच टेक्स्ट कमांड्सच्या सहाय्याने हव्या त्या बदलांना अंमलात आणू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला व्हिडिओतील कपडे बदलायचे असतील, बॅकग्राउंड बदलायचे असेल, स्टाइलमध्ये विविधता आणायची असेल किंवा संपूर्ण वातावरण बदलायचे असेल हे सर्व केवळ एका टेक्स्ट कमांडवर शक्य होईल.

कसे काम करतो हा तंत्रज्ञानाचा चमत्कार?

सध्याच्या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड तांत्रिक कौशल्याची गरज असते. पण Meta AI च्या या नवीन प्रणालीमध्ये कोणतीही टेक्निकल स्किलची आवश्यकता नाही. वापरकर्त्यांनी फक्त हवा तो बदल शब्दात सांगायचा (प्रॉम्प्ट टाइप करायचा), आणि AI त्या निर्देशांनुसार व्हिडिओमध्ये हव्या त्या सुधारणा करतो. यामुळे काही मिनिटांत उच्च दर्जाचे व्हिडिओ सहजपणे तयार होतात.

सध्या मोफत, पण नंतर काय?

सध्या हे फीचर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र भविष्यात Meta कडून यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले जाऊ शकते. यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु वापरकर्त्यांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे फीचर कोणासाठी उपयुक्त ठरणार?

Meta च्या मते, हे फीचर प्रामुख्याने क्रिएटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स तसेच स्मॉल बिझनेस ओनर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ कंटेंट तयार करण्याची गरज असलेल्या प्रत्येकासाठी आता कंटेंट तयार करणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार आहे.

Meta ने काय सांगितले?

Meta च्या तांत्रिक टीमनुसार, “आम्ही नेहमीच AI च्या मदतीने लोकांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे नवीन AI व्हिडिओ एडिटिंग टूल आमच्या त्या प्रयत्नांचा पुढील टप्पा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती सहजपणे प्रोफेशनल दर्जाचे व्हिडिओ तयार करू शकेल.”