Fact Check : मेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकचे (Facebook) नाव बदलण्यात आले, त्यानंतर ही कंपनी आता मेटा (Meta) म्हणून ओळखली जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी म्हटले आहे की जगाला त्यांची कंपनी फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी म्हणून नव्हे तर मेटाव्हर्स म्हणून ओळखली जावी.

Fact Check : मेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?
Mark Zuckerberg - Meta - Facebook
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 1:01 PM

मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकचे (Facebook) नाव बदलण्यात आले, त्यानंतर ही कंपनी आता मेटा (Meta) म्हणून ओळखली जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी म्हटले आहे की जगाला त्यांची कंपनी फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी म्हणून नव्हे तर मेटाव्हर्स म्हणून ओळखली जावी. परंतु जगाला कंपनीचे नवीन नाव रुचलेलं दिसत नाही. नव्या नावानंतरही वादाने कंपनीची पाठ सोडलेली नाही. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की जर युरोपियन युजर्सचा डेटा इतर देशांसोबत शेअर करण्याची परवानगी मिळाली नाही तर त्यांना त्यांची सेवा बंद करावी लागेल. मेटाने म्हटले आहे की युजर्सचा डेटा शेअर न केल्यामुळे त्यांच्या सेवांवर परिणाम होत आहे. युजर्स डेटाच्या आधारे कंपनी वापरकर्त्यांना जाहिराती दाखवते.

मेटाने 2022 च्या नवीन अटी स्वीकारणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे, परंतु जर डेटा ट्रान्सफर सुविधा उपलब्ध नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सेवा बंद कराव्या लागतील. आत्तापर्यंत मेटा ही कंपनी अमेरिकन सर्व्हरवर युरोपातील युजर्सचा डेटा साठवून ठेवत होती. परंतु नवीन अटींमध्ये डेटा शेअर करणे प्रतिबंधित आहे.

…तर युरोपातील सेवा बंद करावी लागेल

मेटाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला सांगितले आहे की, शक्य तितक्या लवकर सर्व्हिससाठी नवीन फ्रेमवर्क विकसित न केल्यास युरोपमधील युजर्ससाठी त्यांची सेवा बंद करावी लागेल. EU (युरोपियन युनियन) कायद्यानुसार, युजर्स डेटा अमेरिकेत असू नये, तर META कंपनी युजर्सचा डेटा शेअर करण्याची परवानगी मागत आहे. झुकेरबर्गला युरोपमधील युजर्सचा डेटा अमेरिकन सर्व्हरवरही साठवून ठेवायचा आहे.

यापूर्वी, प्रायव्हसी शील्ड (Privacy Shield) कायद्यांतर्गत युरोपियन डेटा यूएस सर्व्हरवर हस्तांतरित केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये युरोपियन न्यायालयाने हा कायदा रद्द केला होता. प्रायव्हसी शील्ड व्यतिरिक्त, मेटा यूएस सर्व्हरवर युरोपियन युजर्सचा डेटा स्टोर करण्यासाठी Standard Contractual Clauses कराराच्या कलमांचा देखील वापर करत आहे, परंतु युरोपसह अनेक देशांमध्ये याची देखील चौकशी सुरू आहे.

मेटा भारतात Facebook आणि Instagram बंद करणार?

मेटाकडून केवळ युरोपातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद करण्याविषयीचं विधान समोर आलं आहे. त्यामुळे जरी डेटा शेअरींग प्रकरणावरुन कंपनी आणि तिथल्या प्रशासनाचं बिनसलं तरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम केवळ युरोपात बंद होऊ शकतं. कंपनीच्या भारतातील सेवेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय युजर्सच्या डेटाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि कंपनीला त्यावर उत्तर द्यावं लागेल.

इतर बातम्या

पती आणि मुलीच्या फोटोपासून ते प्रभूकुंजच्या पत्त्यांपर्यंत, लतादीदींच्या निधनानंतर नेटिझन्स गुगलवर काय-काय सर्च करतायत?

सावधान! चुकूनसुद्धा डाउनलोड करू नका अशाप्रकारचे ॲप्स, अन्यथा लागेल लाखो रुपयांचा चुणा !

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.