Mobile Under 10,000 : 10 हजारांहून स्वस्त फोन; 12GB रॅम, स्टोरेज पण 256GB, मिळतील दमदार फीचर्स

Smartphone under 10000 : 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा फोन एकदम स्वस्तात हवाय? तो ही दहा हजार रुपयांच्या आत, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण हा स्मार्टफोन तुम्हाला अगदी स्वस्त मिळेल. काय आहेत या मोबाईलची खास फीचर्स, जाणून घ्या...

Mobile Under 10,000 : 10 हजारांहून स्वस्त फोन; 12GB रॅम, स्टोरेज पण 256GB, मिळतील दमदार फीचर्स
स्वस्तात स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 4:58 PM

12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा फोन, तोही अगदी स्वस्तात, तुम्हाला ऑनलाईन मिळाला तर? तुम्ही म्हणाल असा मोबाईल सेंकड हँड असेल, तर नाही. तुम्हाला अगदी दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल मिळेल. त्यात इतरीही दमदार फीचर्स आहेत. कोणता आहे हा स्मार्टफोन, किती आहे त्याची किंमत? जाणून घ्या. या स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर पण काही जोरदार मॉडेल्स आहेत, कमी बजेटमध्ये हे स्मार्टफोन तुम्हाला हायटेक फीचर देतील.

itel A70 Price in India

आयटल स्मार्टफोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा हा स्मार्टफोन दिसायला पण आकर्षक आहे. हा स्मार्टफोन 8 हजार 499 रुपयांना मिळत आहे. हा मोबाईल तुम्ही कोणत्या पण कॉमर्स साईटवरुन खरेदी करु शकता. अथवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा

itel A70 Specifications

या बजेट स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्जपर्यंत रिफ्रेश रेट आणि 500 निट्स पीक ब्राईटनेसचा 6.6 इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. Apple iphone प्रमाणेच या स्वस्त फोनमध्ये Apple Dynamic Island सारखे डायनॅमिक बार फीचर मिळते. त्यामुळे युझर्सला नोटिफिकेशन शो होते.

स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या फोनमध्ये युनिसॉक टी 603 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या फोनमध्ये युनिसॉक टी603 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सल प्राथमिक कॅमेरा सेन्सर आणि एआय सेंकडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनच्या समोरील बाजूस 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. संरक्षणासाठी या हँडसेटमध्ये पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. Flipkart Offers नुसार, या स्मार्टफोनमध्ये जोरदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ICICI आणि यस बँक कार्डद्वारे बिल पेमेंटवर 10 टक्के (1500 रुपयांपर्यंत ) सवलतीचा फायदा उचलता येईल.

10 हजारांपर्यंत स्मार्टफोनचे हे पर्याय पण जोरदार

जर तुम्हाला 5जी कनेक्टिव्हिटीचा स्मार्टफोन हवा असेल आणि बजेट पण 10 हजार रुपयांपर्यंत असेल तर मग ग्राहकांना इतर पण मॉडल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये Poco M6 5G (9999 रुपये, 6GB रॅम) आणि Realme C53 (108MP कॅमेरा फोन, किंमत 9999 रुपये) हा पर्याय पण उपलब्ध आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.